उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही- नारायण राणे
मुंबई -लोकसभा निवडणुकीतनंतर देशात मोदींच्या नेतृत्वात नवं सरकार आलं. या सरकारने देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे. या अर्थसंकल्पामुळे अर्थसंकल्पामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणा आहे. मात्र आमच्या विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे, असं खासदार नारायण राणेंनी म्हटलं आहे.
भाजपा खासदार नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याव टीका केली.

उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातलं बजेटही माझ्याकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले ते समजलं आहे. आत्ता साडेचार लाख कोटींचं बजेट राज्याकडे आहे. यांना त्यावेळी कळलं का किती तूट आहे? मोदी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. उद्धव ठाकरेंना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले, आम्ही बजेट मांडून लोकांना फायदा करुन दिला. तुम्ही तर राकोषीय तूट वाढवून दाखवली असा टोला नारायण राणेंनी लगावला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. उद्धव ठाकरे,राहुल गांधी यांच्यासह प्रमुख विरोधकांनी हा अर्थसंकल्प देशासाठी हितकारक नाही म्हटलं आहे. या सगळ्यांना आज नारायण राणेंनी उत्तर दिलं
देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या टीका होताना दिसते आहे. अनिल देशमुख, श्याम मानव, संजय राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले. त्याबाबत नारायण राणेंना विचारलं असता,देवेंद्र फडणवीस यांच्यामागे भाजपा आहे. ते एकटे नाहीत, असंही नारायण राणें म्हणाले.












Click it and Unblock the Notifications