अक्षय शिंदेंचं 'जेजे'त पोस्टमार्टम! एका एन्काऊंटरने न्याय मिळाला वाटत असेल तर.. अमोल कोल्हेंची टीका
Badlapur Case Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा काल बदलापूर, ठाणे येथे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. यानंतर काल रात्री त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले आणि आज सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत त्यांचा पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम जेजे रुग्णालयातील तज्ञ तसेच फॉरेन्सिक टीम करणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आता राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप सुरु झाले आहेत. खासदार अमोल शिंदे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. आणि इतर गुन्ह्यांच्या अनुशंगानेही फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

बदलापूर येथील शालेय मुलींशी गैरकृत्य केल्याच्या आरोपाखाली शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याला अटक झाली होती. याखेरीज त्याच्या एका पत्नीने शिंदे याने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीने केलेल्या याच आरोपाची चौकशी करण्यासाठी काल सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झीट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. त्यावेळी त्याची आणि पोलिसांची झटापट झाली आणि त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार केला यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
#WATCH | Maharashtra: Badlapur sexual assault accused Akshay Shinde died yesterday after being shot at by Police in retaliatory firing in Badlapur, Thane.
— ANI (@ANI) September 24, 2024
He was brought to Chhatrapati Shivaji Maharaj Hospital in Kalwa last night and his panchnama was done this morning in the… pic.twitter.com/6RzHe6F88l
या घटनेनंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले. याप्रकरणानंतर राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की, हे एनकाऊंटर केलं नाही तर पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या एनकाऊंटर आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला आहे. अमोल कोल्हे यांनी एक फेसबूक पोस्टही लिहिली आहे. नेमके काय म्हणाले अमोल कोल्हे हे जाणून घेऊया.
गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात 213 भगिनींवर अत्याचार
अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले की, "केवळ एका 'एन्काऊंटर'ने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धूळफेक आहे. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात 213 माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत. बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालढकल, इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणे ही पार्श्वभूमी देखील आहे. बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणे आवश्यक आहे."
बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे याच्यासंदर्भात दोन बातम्या आल्या. पहिली बातमी की आरोपीने आत्महत्या केली नंतर दुसरी बातमी आली की त्याचा एनकाऊंटर झाला. यामुळे प्रश्न निर्माण होत आहे. त्याला शिक्षा व्हायला हवी होती पण अनेक प्रश्नाची उत्तर आरोपीकडून उकल हवी होती. पोलिसांची लाॅक असलेली गण तो उघडू कसा शकतो..हातात बेड्या असताना काढतो कशी फायरिंग करतो कशी आणि अर्ध्या तासाच्या अंतरात दोन बातम्या येतात कश्या असा प्रश्नही अमोल कोल्हे यांनी केला आहे..












Click it and Unblock the Notifications