Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचा स्फोट होईल, बच्चू कडू यांचा शिंदे सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर : आम्ही उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणतीही शक्ती आम्हाला थांबू शकत नाही. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, जाणीवपूर्वक कोणी जर आडवे येत असेल तर त्याचा स्फोट होईल,असा इशारा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारला दिला आहे. मोर्चानंतर आम्ही पुढ्ची भूमिका घेऊ,असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले आहे.

Bachu Kadu

दिव्याग मंत्रालय झालं पण मानधन वाढलं नाही. घरकुल नाही, बच्चू कडू यांचा आवाज दाबू शकलं पण शेतकरी शेतमजूरचा आवाज दाबू शकत नाही. आमच्या मागण्या सरकारने सरकारने मान्य केल्या तर निवडणूक लढणार नाही. उद्या मोर्चानंतर काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू, असं बच्चू कडू यांनी एका वृतवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, उद्याचा मोर्चासाठी पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचे धाडस करू नये. त्यांनी दंडा उचलला तर आम्ही आणखी ताकदीने समोर जाऊ, असा इशाराच कडू यांनी दिला आहे. महायुतीत राहायचं की नाही राहायचं उद्या मोर्चा नंतर ठरवू. महायुतीला धक्का द्यायचा की, सोबत राहायचं हे दूर जायचं हे उद्या पाहू. आम्ही जागा मागितल्या नाही. आमदारकी मागितली नाही. आमची लढाई ही मुद्यांवर आहे. जर मागण्या माण्य झाल्या नाही तर गाठ आमच्याशी आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+