Ashadhi Ekadashi : पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणींचे दर्शन एकत्र का होत नाही! जाणून घ्या मोठे कारण
Ashadhi Ekadashi : आज ६ जुलै २०२५ आषाढी एकादशी..मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडक्या विठुरायाची महापुजा आज सपत्निक पार पडली. पंढरपुरात सद्या लाखो विठ्ठलभक्त सावळ्या विठूरायाच्या दर्शनाला वारीच्या माध्यमातून पोहचले आहेत. आठ ते दहा लाख भाविक पंढरपुरात येतात पण या सर्वांना विठ्ठल-रुख्मिणीचे एकत्र दर्शन होत नाही. पंढरपुरात विठुराया आणि रुख्मिणी या दोघांचे दर्शन का एकत्र होत नाही. पंढरपुरात विठ्ठल रुख्मिणीची वेगवेळी मंदिर का आहे, पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी का वेगळे होतात? या प्रश्नांची उत्तरे चला जाणून घेऊया.

काय आहे आख्यायिका?
पंढरपुरात विठ्ठल रुख्मिणीची वेगवेगळी मंदिर आहे. याचे एक रहस्य आहे, सावळा विठ्ठल हे कृष्णाचे रुप मानले जाते. विठ्ठलाच्या आरतीत वामांगी रुखमाई असे वर्णन जरी केले असले तरी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नेहमी असणारी रखुमाई पंढरपुरात नाही याचे कारण म्हणजे जेव्हा रखुमाई रुसली तेव्हा ती चिंचेच्या वनात जाऊन बसली.
कितीही रुसवा काढला तरी ती आली नाही म्हणून पंढरपुरात तिचे आणि विठ्ठलाचे मंदिर वेगवेगळे आहे असे मानले जाते. याचा उल्लेख पद्मपुराण आणि स्कंदपुराणात केला आहे.
का रुसली माता रुख्मिणी?
असे सांगितले जाते की, कृष्ण आणि राधेचे सख्य होते. कृष्णाने गोकूळ सोडले आणि द्वारकेचा राजा बनला. रुख्मिणी कृष्णाची पट्टराणी बनली. एकदा राधा द्वारकेत आली आणि श्रीकृष्णांच्या जवळ जाऊन बसली. तेवढ्यात रुख्मिणी आली. तिला ते आवडले नाही.
रुख्मिणी येऊनही राधा कृष्णाजवळून उठली नाही, याचे रुख्मिणीला वाईट वाटले. तिचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले. मग ती तेथून रागाने तपश्चर्या करायला दिंडिर वनात आली. श्रीकृष्णाने शोध घेत दिंडिर वन गाठले तिला घरी चल म्हणाले पण तिने ऐकले नाही व रुख्मिणी घरी आली नाही. ती तिथेच राहीली अशी कथा स्कंदपुराणात आहे.
..वारकऱ्यांच्या गर्दीत रुख्मिणी दिसली नाही
म्हणूनच पंढरपुरात विठ्ठलची जिथे मुर्ती आहे त्यामागील बाजूला तोंड करुन रुख्मिणीची मुर्ती आहे. पांडूरंग नेहमीच भक्तामध्ये रमायचे रुक्मिणीला वेळच देत नव्हते. त्यामुळेही रुख्मिणी रुसल्याचे सांगितले जाते.विठ्ठलासोबत रुख्मिणीची मुर्ती जवळ नसल्याचे आणखी एक कारण लोकगीतात आहे. ते म्हणजे दागदागिने रुख्मिणी झाली, पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या गर्दीत विठ्ठलाला रुख्मिणी दिसलीच नाही.त्यामुळे रुख्मिणी रुसली असेही सांगितले जाते.
आणखी एक कारण वाचा
अख्यायिका अशीही आहे की, पुंडलिकाने वरदान मागितल्यानंतर (त्याने परमेश्वराला आपल्यासाठी नेहमी त्याच आसनात उभे राहण्यास सांगितले कारण त्याला ही मुद्रा आवडते), भगवान विठ्ठल जसे आहेत, तसेच राहिले. जेव्हा रुक्मिणीजींनी मी काय करू असे विचारले तेव्हा भगवानांनी तिला तिथेच उभे राहण्यास सांगितले (म्हणजे ती उभी होती तिथपर्यंत). तेव्हापासून ते या देवाच्या रूपात वेगळे उभे आहेत. पंढरपुरात विठ्ठलसोबत रुख्मिणीची मुर्तीजवळ नसल्याची अशी विविध कारणे सांगितले जातात.












Click it and Unblock the Notifications