हिंदूंना आंतकवादी म्हणणाऱ्यांच्या सोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले; अमित शहांचा हल्लाबोल
Amit Shah addresses public meeting in Sindkheda : ज्यांनी राम मंदिर बनविण्याला विरोध केला. 370 हटविण्याला विरोध केला. हिंदूंना आंतकवादी म्हणाले त्यांच्या मांडीला मांडू लावून उद्धव ठाकरे जाऊन बसले. त्यांना तुम्ही साथ देणार का?, लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे मिळाले की सुप्रिया सुळे चूकीचा प्रचार करतात, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे आयोजित प्रचारसभेला शहा सोबत बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला.
पुढे बोलताना अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं. त्यांनी केंद्रातून केंद्रासाठी किती निधी आणला. २००४ ते २०१४ पर्यंत केंद्रात शरद पवार हे मोठे मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी काय विकास केला. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासासाठी १० लाख 14 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. त्याचबरोबर वाढवण येथील बंदरकामासाठी कोट्यावधींचा निधी दिला. शरद पवार यांनी येथे विकासाचे काम अजिबात केले नाही.

कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल
दहा दहा वर्षे या देशात व राज्यात सोनिया गांधी राहुल गांधी यांचे सरकार होते, तोपर्यंत या देशात पाकिस्तानातून आंतकवादी येथून ब्लास्ट करत होते. परंतु, नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवर आले, तेव्हापासून या देशात एकही आंतकवादी हल्ला झाला नाही. एवढंच काय, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सैनिकांनी सर्जिकल स्टाईक करून थेट पाकिस्तानात जाऊन त्यांच्या घरात घुसून आंतकवाद्यांना संपवले.
राहुल गांधींची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण नाही
राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकावे, की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर SC, ST, OBC आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावे लागणार आहे. मात्र ते होणे शक्य नाही, असे अमित शहा म्हणाले. देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचे अमित शहा यांनी म्हणाले.
इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी 370 पुन्हा लागू होणार नाही
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्राने जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवले, आता पुन्हा कॉंग्रेसचे लोक जम्मू काश्मीरमध्ये गोंधळ घालू लागले आहेत. तिथे त्यांना पुन्हा ३७० लागू करायचे आहे. पण हे आता शक्य नाही. एवढंच काय तर इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी 370 कलम पुन्हा लागू होणार नाही, असे म्हणत अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही राम मंदिराचा संकल्प पूर्ण केला
अमित शहा म्हणाले की, आम्ही राम मंदिराचा संकल्प केला होता. आणि पूर्णत्वास देखील नेला. साडे पाचशे वर्षानंतर रामलल्ला हे त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात जाऊन बसलेत, हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे शक्य झाले.
महायुती केवळ जनतेसाठी काम करते..
महायुतीच्या सरकारने राज्यातील महिलांना मोठा दिलासा दिला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता आमचे सरकार पुन्हा येताच 2100 रुपये दिले जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल. तर पीएम किसान योजनेचा निधीत देखील 15 हजारांपर्यंत वाढ केली जाणार आहे. पाणंद रस्ते बनवले जाईल, अंगणवाडी सेविकांना 15 हजारांचे वेतन मिळणार, अशी ग्वाही देखील अमित शहा यांनी या सभेत दिली.












Click it and Unblock the Notifications