Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संतोष देशमुख खून प्रकरण : आरोपींना मोक्का, वाल्मिक कराडवरही गुन्हा दाखल; फडणवीसांची A टू Z माहीती

Santosh Deshmukh murder case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आज दुसऱ्या दिवशीही हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणातील जो कोणी मास्टरमाईंड असेल त्याच्या लवकरच मुसक्या आवळण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले. शिवाय या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचेही स्पष्ट केले. बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली करण्याचे आदेशही फडणवीसांनी दिले.

Santosh Deshmukh murder case

वाल्मिक कराडवर स्पष्टच बोलले

या प्रकरणाती पोलिसांचा हलगर्जीपणा दिसला. त्यामुळे बीडच्या पोलिस अधिक्षकांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्र्‍यांनी दिले. तसेच या प्रकरणात वारंवार वाल्मिक कराडचे नाव येत आहे. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणात वाल्मिक कराड विरोधात पुरावे सापडले तर, तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाच्या जवळचा आहे, हे न पाहता थेट कारवाई करण्यात येईल. या घटनेचा जो कोणी मास्टरमाईंड असेल, त्याला सोडणार नाही, असा विश्वास फडणवीसांनी सभागृहाला दिला.

सर्व आरोपींना मोक्का

अगोदर फिर्याद नोंदवायची व नंतर बी समरी करायची, या बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर फडणवीसांनी ताशेरे ओढले. या प्रकरणाती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जे कोणी आरोपी असतील, त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा विश्वास फडणवीसांनी दिला. यात कुणावरही दया-माया दाखविली जाणार नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

होणार एसआयटी चौकशी

सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारीअंतर्गत कारवाई करण्यात येईल. या प्रकारणाची दोन प्रकारची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्‍यांनी स्पष्ट केले. एक आयजी दर्जाचा अधिकारी यांच्याअंतर्गत एसआयटी तयार केली आहे. ती टीम या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे, यासाठी न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल. साधारणपणे तीन ते सहा महिन्यात ही चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीसांनी दिले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+