Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिंदेंचा शिलेदार शेकापला भिडणार; कोट्यवधीच्या विकासकामांचे पाठबळ

Maharashtra Assembly Election 2024 : कोकणातील रायगड जिल्हा हा गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला. येथील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती, शिक्षण संस्था यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांचे प्राबल्य राहिले. हळूहळू शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आकर्षक गेला आणि अनेक दमदार नेत्यांनी अन्य पक्षात आश्रय शोधला. कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाने शेतकरी कामगार पक्ष समोर तगडे आव्हान उभे झाले. त्यानंतर शिवसेनेने ही हळूहळू जिल्ह्यात पाय विस्तारायला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची वाढ होत असली तरी अलिबाग मध्ये मात्र पाटील कुटुंबीयांच्या रूपाने शेतकरी कामगार पक्ष आपले आव्हान कायम ठेवून होता. या आव्हानाला दणका दिला तो शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी. म्हणूनच महेंद्र दळवी हे नाव शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

शेकापचा गड शिवसेनेकडून उद्ध्वस्त

अलिबाग हा रायगड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. अलिबाग शहर हे पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. मुंबईकर नागरिकांसाठी वीकेंडचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणून अलिबागकडे पाहिले जाते. मुंबईतून शुक्रवारी संध्याकाळी बोटीतून अलिबागला येणारे आणि सोमवारी सकाळी पुन्हा मुंबईला जाणारे अनेक धनाढ्य नागरिक आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा अनेक दशकांपासूनच शेतकरी कामगार पक्षाचा गड राहिला आहे. या मतदारसंघातून शेकापच्या दत्तात्रय पाटील यांनी 5 वेळा प्रतिनिधित्व केले आहे. तसेच शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील या तीनवेळा अलिबागमधून निवडून आल्या आहेत. 2014 साली शेकापचे सुभाष पाटील निवडून आले होते. 2019 मध्ये पहिल्यांचा शिवसेनेने शेकापचा बालेकिल्ला उद्धवस्त करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता. येथून शिवसेनेचे महेंद्र दळवी आमदार झाले.

Mahendra Dalvi vs Chitralekha Patil

शेकापच्या उमेदवाराला पुन्हा भिडणार

2022 साली शिवसेनेत मोठी उलथा पालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले. हा हा म्हणता शिवसेनेचे बहुसंख्य आमदार एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन मोकळे झाले. यात रायगड जिल्ह्यातील देखील बहुसंख्य आमदारांचा समावेश होता. पहिल्यांदाच विधानसभेत गेलेले महेंद्र दळवी यांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातून महेंद्र दळवी यांनाच पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्याविरोधात शेकापच्या चित्रलेखा पाटील निवडणूक लढवत आहेत. चित्रलेखा पाटील या शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांचे कुटुंबातील सदस्य आहेत. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेंद्र म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने आता या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शेकाप असा थेट सामना असणार आहे.

आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध

शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. जनतेच्या कामांसाठी प्रशासनाबरोबर पंगा घेणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. अलिबागमध्ये जयंत पाटील यांच्याशी त्यांनी थेट संघर्ष केला. विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत झाल्यानंतर चिखलात लोळून आनंद साजरा करणारे महेंद्र दळवी प्रसिद्ध झाले होते. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विकास कामांसाठी पुरेसा निधी न मिळत असल्यामुळे महेंद्र दळवी नाराज होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर अलिबाग विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आणि त्या माध्यमातून झपाट्याने विकास कामांना सुरुवात करण्यात आली तसेच रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात आली.

पायाभूत सुविधांना वेग

साळाव-रेवदंडा पूल, रेवस-करंजा पूल, अलिबागमधील सरकारी रुग्णालय, बेलकडे ते खारापटी रस्ता अशा अनेक कामांना वेग देण्यात आला.. पहिल्या अधिवेशनात रेवस-करंजा पुलाचा प्रश्न होता. त्याची निविदा प्रक्रिया झाली असून साडेतीन हजार कोटींचे काम ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाले आहे. तसेच साडेबाराशे कोटींच्या साळाव-रेवदंडा पुलाचीही निविदा प्रक्रिया झाली आहे. या पुलाचे काम अशोका बिल्डकोनला मिळाले आहे. तसेच आगरदांडा-दिघी पुलालादेखील मान्यता मिळाली आहे.

सरकारी रुग्णालयासाठी भरीव निधी

अलिबागमधील सरकारी रुग्णालयाची दूरवस्था होती. अडीच वर्षांत त्यासाठी महेंद्र दळवी यांनी खूप प्रयत्न केले. या रुग्णालयासाठी 425 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. उच्च स्तरीय समितीने एकूण 1 हजार 568 कोटींची मंजुरी दिली. त्याचप्रमाणें जिल्हा परिषदेची इमारत धोकादायक झाल्याने येथील कार्यालये विस्थापित झाली आहेत. तो प्रश्न देखील महेंद्र दळवी यांनी ताकदीने लावून धरला. त्यालादेखील 86 कोटी 85 लाखांची मंजुरी मिळाली आहे, हॅमच्या माध्यमातून बेलकडे ते खारापटी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बऱ्यापैकी झाले असून काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. कार्लेखिंड ते रेवस, रेवस कनकेश्वर फाटा ते पुन्हा रेवस रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मजुरी मिळाली आहे. त्याला जोडून बेलकडे ते बायपास रेवदंडा या रस्त्याला देखील मान्यता मिळाली असून त्यासाठी भरीव निधी मंजूर झाला.

संधी अधिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधातून पुट्टेबधींचा निधी आपल्या मतदारसंघात आणण्याची किमया महेंद्र दळवी यांनी साधली आहे. विकास कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. माझी लाडकी बहीण सारखी योजना ही परिणामकारकपणे राबवण्यात आली आहे. शेक अपचन प्रबळ विरोधक असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन शक्ती एकत्र आले आहेत तसेच शहरी भागात असलेला भाजपचा मतदार महेंद्र दळवी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे त्यामुळे थेट लढत असली तरी महेंद्र दळवी यांना जिंकण्याची संधी अधिक आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+