7 ते 8 निवडणुका झाल्या आता मला रस नाही! अजित पवारांचं वक्तव्य, मुलगा जय पवार निवडणूक लढवण्याचे संकेत
Ajit Pawar on Election : "मी सात-आठ निवडणुका लढल्या. आता मला रस नाही. जय पवारबाबत जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतील, जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले."
अजित पवार आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एका अर्थाने अजित पवार यांनी यंदा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले असून ते आता त्यांचा लहान मुलगा जय पवार यांना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एकूणच जय पवार हे बारामतीतून निवडणूक लढवू शकतात.

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालूच होती,आज जे अजित पवार यांनी भाष्य केलं त्यामुळं या शक्यतांना अधिक बळ मिळालं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार निवडणूक लढवणार आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरातून नाही हा शब्द आला नाही म्हणजेच त्यांचा या विषयी दृष्टीकोन सकारात्मक वाटतो. ते म्हणाले की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका केल्यात. त्यांच्यासंदर्भात (जय पवार) जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदीय मंडळ निर्णय घेतली.
जनता कार्यकर्त्यांवर निर्णय
अजित पवार यांनी बोलताना हेही म्हटलं आहे की, जय पवार यांच्यासंदर्भातील निर्णय जनता, कार्यकर्ते आणि पार्लामेंटरी बोर्ड जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. अजित पवार यांनी जय पवार बारामतीमधून लढण्याची शक्यता नाकारली नाही. त्यामुळे अजित पवार यांनी बारामती विधानसभेचा निर्णय जनतेवर सोडून भविष्यातील वेगळ्या राजकारणाचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांसोबत वाद नाहीच
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत एका फाईलवर सही करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याचं बोललं जात होतं. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टोक्ती आज दिली.
या बातम्या खोट्या आहेत. आमच्यात कुठलाही वाद आणि मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने सरकार चालवत आहोत. मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला एकत्र जाऊन आलो. विरोधकांकडे सध्या टीकेसाठी कोणताही मुद्दा उरलेला नाही असा खुलासा त्यांनी केला.












Click it and Unblock the Notifications