Big News: विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची फिल्डिंग! 8 ऑगस्टपासून महाराष्ट्रात जनसंवाद यात्रा
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी फिल्डिंग लावली असून जनसन्मान यात्रा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस काढणार आहे. नाशिकपासून ही यात्रा सुरु होणार असून
दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर अशा मार्गाने ही जनसन्मान यात्रा काढली जाणार आहे.
8 ऑगस्टपासून ही यात्रा सुरु होणार आहे. नाशिकनंतर पश्चिम महाराष्ट्र, मुंबई कोकण विभागानंतर ही यात्रा 22 ऑगस्टनंतर विदर्भात येईल.नागपूरपासून सारा विदर्भ ही यात्रा पादाक्रांत करणार आहे.याशिवाय साऱ्या महाराष्ट्रात ही यात्रा जाईल.

महायुतीच्या इतर आमदारांशीही चर्चा
सुनील तटकरे म्हणाले, या यात्रेद्वारे महाराष्ट्र पादाक्रांत केला जाणार असून कार्यकर्ते, जनतेशीही संवाद साधला जाईल. या दौऱ्याच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी युतीतील मित्र पक्षातील भाजप, शिवसेनेच्या आमदारांशी जवळपास एक-दीड तास संवाद केला जाईल. महायुतीत सौहार्दाचे वादावरणासाठी हा प्रयत्न असेल.
योजनांची माहिती लोकांना देणार
सुनील तटकरे म्हणाले, राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दहा अर्थसंकल्प सादर केले. ते एकमेव व्यक्ती आहेत. अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पाहता चांगल्या योजना त्यांनी महाराष्ट्राला दिल्या आहेत. या बजेटमध्ये ज्या योजनांसाठी तरतुद आहे त्या लोकांपर्यंत सांगणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
जनतेशी संवाद साधणार
सुनील तटकरे म्हणाले, लोकांच्या मनात ज्या काही शंका योजनेबाबत आहेत त्यावर जनतेला जागृत केले जाणार आहे.ही यात्रा केवळ पक्षापुरतीच राहणार नाही. त्यात आमच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांशीही आम्ही संवाद साधणार आहोत. समाजातील सर्व घटकांशी संवाद करण्याचा आमचा प्रयत्न आहे, यात्रेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घेतल्या जातील. महिला,युवक, शेतकरी घटकांशी अजित पवार संवाद साधतील.
सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील लोकांच्या मनात कोणतीही शंका महायुतीबाबत नाही. आम्ही जनसन्मान यात्रा अभुतपूर्व असेल व ती वेगळा विषय जनतेसमोर घेऊन जाणार आहे.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही शिव-शाहू, फुले आंबेडकरांच्याच विचारांवर चालणार आहोत. ही गोष्ट आधीच ठरलेली आहे. आमच्या भुमिकेत कोणताही बदल होणार नाही. यासंदर्भात अमित शहा यांनाही आम्ही सांगितलेले आहे. कावड यात्रेवर लोकांचा नाव उघड करणे हे युपी सरकारने जारी केलेले नोटीफिकेशन वापस घ्यायला हवे. महाराष्ट्रात आम्ही सेक्युलर पार्टी म्हणून आम्ही पुढे जात आहोत. आमची यात्रा नाशिक, उत्तर महाराष्ट्रापासून सुरु होईल व साऱ्या महाराष्ट्रात जाईल.












Click it and Unblock the Notifications