अजित पवारांसह आजवर 'या' 12 दिग्गज नेत्यांचाही विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; देशाने गमावले अनेक हिरे
Ajit Pawar Plane Crash 12 Indian Politicians Who Died in Aviation Accidents : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या धक्कदायक बातमीने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. मात्र, भारतीय राजकारणाच्या इतिहासात अशा विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांनी अनेक कर्तबगार नेत्यांना आपल्यातून हिरावून घेतले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर, आकाशात झेप घेताना काळाच्या पडद्याआड गेलेल्या अशाच १२ दिग्गजांच्या स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

विमान अपघातात प्राण गमावणारे १२ भारतीय दिग्गज
१. विजय रूपाणी (१२ जून २०२५)
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी अहमदाबादहून लंडनला जात असताना एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. या भीषण अपघातात २४२ प्रवाशांपैकी केवळ एक जण वाचला.
२. वाय. एस. राजशेखर रेड्डी (२ सप्टेंबर २००९)
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर यांचे हेलिकॉप्टर कर्नूलच्या डोंगराळ भागात बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला.
३. माधवराव सिंधिया (३० सप्टेंबर २००१)
काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव सिंधिया यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे विमान कोसळून निधन झाले होते.
४. संजय गांधी (२३ जून १९८०)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र संजय गांधी यांचे दिल्लीत विमान कलावाजी (Stunts) करताना अपघात होऊन निधन झाले.
५. जनरल बिपिन रावत (८ डिसेंबर २०२१)
भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या घटनेत त्यांच्या पत्नीसह १३ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
६. जी. एम. सी. बालयोगी (३ मार्च २००२)
लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बालयोगी यांचे आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झाले.
७. ओम प्रकाश जिंदाल (३१ मार्च २००५)
प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे मंत्री ओ. पी. जिंदाल यांचा दिल्लीहून चंदीगडला जाताना सहारनपूरजवळ मृत्यू झाला.
८. डोरजी खांडू (३० एप्रिल २०११)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळले होते. ५ दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला होता.
९. बलवंतराय मेहता (१९ सप्टेंबर १९६५)
गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचे विमान १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शत्रूने पाडले होते.
१०. सुरेंद्र नाथ (१९९४)
पंजाबचे तत्कालीन राज्यपाल सुरेंद्र नाथ यांचा हिमाचल प्रदेशातील मंडी येथे विमान अपघातात मृत्यू झाला.
११. मोहन कुमारमंगलम (१९७३)
केंद्रीय मंत्री मोहन कुमारमंगलम यांचा इंडियन एअरलाईन्सच्या विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला.
१२. एन. व्ही. एन. सोमु (१४ नोव्हेंबर १९९७)
माजी संरक्षण राज्यमंत्री सोमु यांचा अरुणाचल प्रदेशात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.












Click it and Unblock the Notifications