"मुली, महिलांवर जे हात टाकतात अशा नराधमांचं ..XXX काढून टाकायला हवं!" - अजित पवारांचा संताप
"आपल्या मुलींवर, महिलांवर जे हात टाकतात अशा काही नराधमांना कायदा दाखवायला हवा.. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर ...तर त्यांचं....काढून टाकायला हवं! परत नाहीच असे कृत्य.. हे केलेच पाहीजे इतके काहीकाही नालायक लोक आहे." अशा भाषेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बदलापूरसारख्या घटनांवर आपला संताप व्यक्त केला.
महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रसार प्रचार कार्यक्रमात आज ते यवतमाळ इथं बोलत होते.

विरोधक टीका करत होते
अजित पवार म्हणाले, महायुतीचं सरकार शेतकरी कसा समाधानी होईल यावर काम करत आहे. लाडकी बहिण योजना चांगली आहे पण विरोधक टीका करत आहेत. ती योजना बंद करायला कोर्टात गेले आहेत. सुदैवाने कोर्टाने आपल्याबाजूनं मान्यता दिली. महाराष्ट्रातील महिला या योजनेवर खूश आहेत, काहींना या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत.
कुणालाही लाभापासून वंचित ठेवणार नाही
अजित पवार म्हणाले, थोडं समजून घ्या, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की, कुणालाही लाभापासून वंचित ठेवणार नाही. आम्ही जी नियमावली ठरवली आहे. त्या नियमावलीत तु्म्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार. रक्षाबंधन होऊन गेलं आजही माझ्या बहिणी मोठ्या संख्येने राखी बांधतात. आम्ही ओवाळणीच्या निमित्तानं पहिले तीन हजार रुपये सोडलेले आहेत.
वर्षाला ४५ हजार कोटींचा खर्च
अजित पवार म्हणाले, दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत, ही खूप मोठी रक्कम नाही. यातून सर्वच गरजा भागतील असेही नाही पण वर्षाला या योजनेच्या माध्यमातून आम्ही ४५ हजार कोटी रुपये वर्षाला माझ्या गोरगरीब महिलांना मिळणार आहे. हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना ही रक्कम मिळायला हवी. ही योजना चांगली आहे.
सरकार डोळ्यात तेल घालून सुरक्षा करतंय
अजित पवार म्हणाले की, विरोधकांनो जरा बघा महिलांचं लाडकी बहिण योजनेवर काय मत आहे ते सतत काहीतरी टीका टिप्पणी ते करतात, पण माझ्या मायमाऊलींना सांगायचं आहे की, काही विकृत माणसं असतात, काही नराधम असतात तिथं काहीतरी घडलं तर लगेच सांगितलं जातं की, बघा महिलांना आज हे मदत करतात पण सुरक्षिततेचं काय? सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघतंय. स्वतः गृहमंत्र्यांनी मोठी पोलिस भरती काढली आहे.
जो चुकीचा त्यांना शासन व्हायलाच हवं
अजित पवार म्हणाले, डोंगरी भाग, विदर्भासह महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी कायदे केले जात आहेत पण काही नराधम काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी जोडण्याचा विरोधक करतात. माझी विरोधकांना विनंती आहे की, तसे करु नका. जो चुकीचा आहे त्याला शासन व्हायलाच हवं. मग तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या त्याची आम्ही फिकर करणार नाही. आमचा प्रयत्न आहे की, शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे तो लवकर मंजूर करायचा आहे.












Click it and Unblock the Notifications