Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवार शरद पवारांची भेट! ठाकरेंनंतर आता पवार कुटुंबांचेही होऊ शकते राजकीय मनोमिलन? चर्चांना ऊत

Ajit Pawar meets Sharad Pawar : महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचे राजकारण झाल्यानंतर त्याचा फटका या उभय पक्षांना बसला आहे. त्यानंतर आता शिवसेना (युबीटी) आणि मनसे अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसे संकेतही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिले यानंतर आता अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्र येऊ शकतो अशी चर्चा आहे.

तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या चर्चांना बळ मिळाले आहे.

Ajit Pawar meets Sharad Pawar

राज्यात गत निवडणुकीनंतर आजपर्यंत वारंवार राजकीय भूकंप झाले आहेत, यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांत फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यांचे मोठे नुकसान झाले. एकनाथ शिंदेंसारखाच अजित पवारांनी वेगळी चूल मांडून पक्षावर दावा केला आणि तो मजबूतही केला. 2 वर्षांपूर्वी जुलै 2023 मध्ये त्यांनी आपल्या काकांच्या विरोधात बंड केले आणि राष्ट्रवादीच्या गटासह राज्यात स्थापन झालेल्या महायुती आघाडीत सामील झाले. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला प्रमुख पक्ष म्हणून घोषित करण्यात आले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा असतानाच शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. स्वत: काका शरद पवार यांना त्यांचे पुतणे अजित पवार यांनी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावे, असे वाटत असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार- शरद पवारांची भेट

गेल्या काही महिन्यांत शरद पवार आणि अजित पवार अनेकदा मंचावर एकत्र दिसले. राजकीय क्षेत्रात काका-पुतण्यांचे मार्ग काही वर्षांपासून वेगळे झाले असले, तरी त्यांनी एकत्र मंचावर होते. यानंतर एका लग्न समारंभात पवार कुटुंबीय एकमेकांना भेटले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांच्या लग्न समारंभात पोहोचले. पुण्यात झालेल्या एंगेजमेंट सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील लोकांनी हजेरी लावली होती.

काय म्हणाले अजित पवार?

वसंतदादा साखर संस्थेसंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार दोघेही हजर होते. त्यानंतर दोघांची वेगळी बैठकही झाली. यात नेमके काय घडले याबाबत खुद्द अजित पवार यांनीच स्पष्ट केले आहे.

अजित पवार म्हणाले, पवार कुटुंबियांचा साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता, तो वैयक्तिक कार्यक्रम आहे, त्यावर राजकीय आणि इतर विषयावर चर्चा करणे योग्य नाही. येथे काहीही राजकीय संबंध नाही. सामाजिक, शैक्षणिक कामासाठी बैठकांसाठी आम्ही भेटतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

"दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद"- कोण म्हणाले?

तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास आनंद होईल. तसेच एकत्र आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर महाराष्ट्रात पक्ष भक्कम होईल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पाटील यांनी म्हटले आहे. यासंदर्भात साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+