Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Budget 2024: अजित पवार बॅग घेऊन विधानभवनात दाखल, अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राचे लक्ष

मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून आज २८ जून रोजी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. विधानसभेच्या तोंडावर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे बॅग घेऊन विधानभवन परिसरात दाखल झाले आहेत.

थोड्याच वेळात अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने यात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ७.६% वर्तवण्यात आला आहे.

ही वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेइतकीचं असून राज्याचे स्थूल उत्पादन ४० लाख ४४ हजार ८९८ कोटी अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रामध्येही ९.१% वाढ अपेक्षित आहे.

maharashtra state budget

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र कितव्या स्थानी?

दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा पहिल्या क्रमांकावर, त्या खालोखाल कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात आहे. महाराष्ट्राचे २०२३-२४ मध्ये दरडोई उत्पन्न २ लाख ७७ हजार ६०३ रूपये अपेक्षित आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनाही नव्याने लागू करू शकते. तर राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वादावर सरकार तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या जाऊ शकतात.

मुस्लिमांसाठी काय?

लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने महायुतीला मतं दिली नाहीत असं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. विधानसभा निवडणुकीत देखील ही मतं निर्णायक ठरणार आहेत. या दृष्टीने मुस्लीम समाजासाठीही सरकार काही तरतुदी करण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ मुस्लिम आरक्षणाच्या मागणीनेही जोर धरला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी मोठ्याप्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे सरकार मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर काय तोडगा काढणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

विधानसभेच्या दृष्टीने सादर होणार अर्थसंकल्प

लोकसभा निडवणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसलाय. हे नुकसान विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहे. राज्यातील शेतकरी, तरुण, महिला, कामगार यांच्यासह मराठा समाजासाठीही काही घोषणा केल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विरोधकांकडून आधीच हल्लाबोल

दरम्यान अर्थसंकल्पाबाबत विरोधकांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच टीका करणं सुरू केलेलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातील मात्र अंमलबजावणी होणार नाही असं विरोधकांनी म्हटलेलं आहे. आज सकाळी सुद्धा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+