शब्द देतो..अशी चूक पुन्हा होणार नाही! अजित दादांनी जोडले हात! 13 कोटी जनतेची मागितली माफी कारण काय?

मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेवरुन महाराष्ट्रात रान पेटलं असून विरोधकही राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवत आहे. या शा‍ब्दिक हल्ल्यांना आणि विरोधांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी थेट हात जोडत राज्यातील तेरा कोटी जनतेची माफी मागीतली आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सरकारवर चौफेर टीकेची झोड उठली आहे. यादरम्यान अजित पवारांनी जनतेची माफी मागणे मोठी गोष्ट असून त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.

Ajit Pawar on Malvan Rajkot Shivaji Maharaj statue fall case Maharashtra Politics

काय म्हणाले ajit pawar?

अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. पण या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागतो असे ते म्हणत त्यांनी हात जोडले.

जनसन्मान यात्रेतून संबोधन

अजित पवार ajit pawar यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बुधवारी लातूर येथे आली. तिथे सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मी ग्वाही देतो. या पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हायला हवे होते कारण हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर होते. त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात. त्यामुळे अशी चूक भविष्यात पुन्हा होणार नाही असा शब्द मी देतो.

राज्याचे बजेट साडेसहा कोटींचे

अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत संबोधित करताना म्हटले की, मी केव्हाही विरोधकांवर टीका केली नाही. कारण, आम्ही कामाची माणसे आहोत. आम्ही 15 हजार कोटींचे विज बील माफ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आता त्यांना केवळ शेतातील मोटार चालू करायची आहे.

वीज बिलाच्या थकबाकीचा त्यांना कोणताही विचार करायचा नाही. आपल्या राज्याचे बजेट साडे 6 लाख कोटी रुपयांचे आहे. त्यातून आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वेगळे पैसे काढले. या योजनेची राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना भविष्यातही सुरू राहील.

कठोर कायदे केले जातील

अजित पवार यांनी यावेळी बदलापूर येथील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवरही दुःख व्यक्त केले, सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. महिला सुरक्षेला कायमच प्राधान्य असून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतील दोषींना फाशी व जन्मठेप व्हावी म्हणून आम्ही सरकार म्हणून प्रयत्नीशल राहू. बदलापूर प्रकरणासारखी विकृती पुन्हा कुणीही करू नये यासाठी संबंधित कायदे आणखी कठोर केले जातील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+