maharashtra budget 2025 : महाराष्ट्रातील वीजदर कमी होणार; अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील वीजदर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या वीजदरामुळे सरकारला जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, आज अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या पाच वर्षांत विजेचे दर कमी होतील, अशी घोषणा केली. या घोषणेमुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाले अजित पवार
अजित पवार म्हणाले, "महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील. अजित पवारांनी केलेल्या या घोषणेनंतर औद्योगिक विजदर कमी होणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
कोरोनाने मोडले होते कंबर
गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील प्रत्येक सरकार सातत्याने जनतेच्या रोषाचा सामना करत असल्याचं पाहायला मिळाले आहे. करोनामुळे राज्यात लॉकडाऊन लावलेला असताना राज्यातील लाखो कुटुंबांना अनेक पटींनी अधिक वीजबिले भरावी लागली होती. तेव्हाच्या सरकारला देखील जनतेच्या संतापाला सामोरं जावं लागलं होतं. राज्यातील विद्यमान महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या आधी प्रचारकाळात वीज दर कमी करण्याबाबत घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीच्या पहिल्याच अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष लागले होते.
खेडोपाडी होणार चांगले रस्ते
अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत ९.६१० किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याची कामे हाती घेतली आहेत. ही कामं मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होतील. पहिल्या टप्प्यात ८ हजार कोटींची केली जाणार आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ७ हजार किमी रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाईल. तिसऱ्या टप्प्यात १ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ३,५८२ गावं १४ हजार किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा-राज्य-राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील. याची एकूण किंमत ३०,१०० कोटी रुपये इतकी आहे.












Click it and Unblock the Notifications