'ते' एक ट्विट आणि राजकारणात भूकंप..! महाविकास आघाडीत पडली फूट; पहा काय आहे त्या ट्विटमध्ये
महाराष्ट्रात सध्या विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला धक्का बसला. लोकसभा व विधानसभेला सोबत असणारी समाजवादी पार्टीने आज तडकाफडकी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमदार अबू आझमी यांनी याबाबतची घोषणा केली. उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी बाहेर पडत असल्याचं जाहीर केले. या सर्व प्रकरणासाठी, ठाकरे गटाच्या एका नेत्याने काल केलेलं ट्विट कारणीभूत ठरल्याच्या चर्चा आहेत.

अबू आझमींनी व्यक्त केला संताप
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझामी यांनी आज महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर चांगलंच तोंडसूख घेतलं. अबू आझमी म्हणाले की, महाविकास आघाडीच्या पराभावानंतरही उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका ठेवली नाही. आमचं हिदूत्व कायम असल्याचं ठाकरेंचं म्हणणं आहे. आम्ही सेक्यूलर आहोत, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत राहणं शक्य नाही. आता काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरेंसोबत रहायचं का, हे ठरवायचं आहे. मात्र आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 5, 2024
ते ट्विट ठरलं कारणीभूत
शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सहा डिसेंबरला बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटनंतर आता हा वाद आणखी चिघळल्याचं काहींचं म्हणणं आहे. अबू आझमी यांनी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली त्या मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांचा प्रचार केला होता. मात्र फक्त ठाकरे गट सेक्यूलर नाही म्हणून आझमींनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. राजकरणात धर्म घेऊन चालणं शक्य नसतं. ज्यांना घ्यायच्या त्यांच्यासोबत आम्हाला चालणं शक्य नाही, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.
काय म्हणाले अबू आझमी?
आझमी म्हणाले, सहा डिसेंबरला आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करतो. बाबरी मशिद त्या दिवशी तोडण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणतात की ज्या शिवसैनिकांनी हे केलं त्यांचं आम्ही स्वागत करतो. असे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे जर सोबत असतील, तर अशा आघाडीमध्ये समाजीवादी पार्टी राहाणं शक्य नाही. अबू आझमींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसलाही सूचना केल्या. ते म्हणाले, नाना पटोले आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. महाविकास आघाडी सेक्युलर आहे की सांप्रदायिक हे स्पष्ट करायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊद्यात पण आमचा पक्ष सेक्युलर आहे, त्यामुळे तो सांप्रदायिक पक्षासोबत राहणार नाही.












Click it and Unblock the Notifications