पाकिस्तानात ट्रेन हायजॅक करणारी बलुचिस्तान लिबरल आर्मी कोण?, जाणून घ्या त्यांच्याविषयी सर्व काही
Pakistan News, Who is Balochistan Liberal Army : पाकिस्तानातील अतिशय मोठी व धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेसचे अपहरण करण्यात आले असून यात जवळपास चारशेहून अधिक लोक अडकले आहेत. तर ही ट्रेन ज्या आंतकवादी संघटनेने हायजॅक केली, त्या बलुच लिबरेशन आर्मीने या सर्व घटनेची जबाबदारी घेतली.
पाकिस्तान सरकार बीएलए अर्थात बलुच लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना मानते. परंतु, या आधी देखील बीएलएकडून सातत्याने अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहे. या संघटनेचे पदाधिकारी स्वत:ला क्रांतीकारी मानतात. त्यांच्या काही मागण्या ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने अशा कारवाया करत असते. चला तर आज जाणून घेऊ या की, बलुच लिबरेशन आर्मी ही संघटना कशी स्थापन झाली आणि तीचा मुख्य उद्देश काय आहे, त्यांनी ट्रेनचे का अपहरण केले...वाचा सविस्तर!

बीएलएने जारी केले निवेदन, चारशेहून अधिक लोक अडकले
पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी एक ट्रेन ताब्यात घेतली आहे आणि प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. रॉयटर्सच्या मते, अपहरण झालेल्या ट्रेनच्या 9 डब्यांमध्ये सुमारे चारशेहून अधिक प्रवासी आहेत. या ट्रेनचे नाव जाफर एक्सप्रेस आहे. पाकिस्तानच्या नैऋत्य भागातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना या ट्रेनवर गोळीबार झाला अन् संपूर्ण ट्रेन ताब्यात घेण्यात आली आहे.
आता जाणून घ्या कोण आहे (BLA) बलुच?
बलुच हा बलुचिस्तान प्रदेशातील एक वांशिक गट ओळखला जातो. जो पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानात पसरलेला आहे. बलुच लिबरेशन आर्मी ही एक बंडखोर आणि सशस्त्र फुटीरतावादी संघटना आहे. जी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रदेशात बऱ्याच काळापासून सक्रिय आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या या प्रांतातील लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांना संसाधनांचा फायदा मिळत नाही.
बलुचिस्तानचे स्वातंत्र्य आणि त्याच्या संसाधनांवर बलुच लोकांचे हक्क प्रस्थापित करता येतील. ही संघटना एक दहशतवादी संघटना मानली जाते आणि ती प्रामुख्याने पाकिस्तानी लष्कर, सरकारी आस्थापने आणि चिनी गुंतवणूक प्रकल्पांवर (विशेषतः CPEC) हल्ला करते. पाकिस्तानने 2006 मध्येच बीएलएला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले आहे. याशिवाय, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे बलुचिस्तान रिपब्लिकन आर्मी आणि लष्कर-ए-बलुचिस्तानसारखे हे देखील गट सद्या या ठिकाणी कार्यरत आहेत.
पाकिस्तानातील बलुचची स्थिती कशी?
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत मानला जातो. परंतु तो त्याच्या सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या आणि गरीब प्रांतांपैकी असलेला एक भाग म्हणून देखील ओळखला जातो. बलुच लोकांची एक वेगळी भाषा ज्याला बलुची असे म्हणतात. तसेच त्यांची संस्कृती आणि आदिवासी परंपरा आहेत. त्यांची ओळख पंजाबी, सिंधी आणि पश्तून सारख्या इतर वांशिक गटांपेक्षा वेगळी आहे.
बलुच लिबरेशन आर्मीचा नेमका लढा कशासाठी?
- बलुच लिबरेशन आर्मीला पाकिस्तान सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले. परंत, या गटातील लोक स्वत:च्या हक्कासाठी लढा देणारे असे मानतात. यात प्रामुख्याने ते सातत्याने या गोष्टीसाठी लढा देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नैसर्गिक संसाधनांनी (वायू, खनिजे यासह अनेक बाबीने समृद्ध असूनही, बलुचिस्तान अविकसित आहे आणि स्थानिक लोकांचे केंद्र सरकारकडून शोषण होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
- दुसरी महत्त्वाची मागणी आहे की, अनेक बलुच लोक राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित, स्वायत्ततेचा अभाव आणि अन्याय्य वागणूक असल्याचा दावा करतात. तिसरा महत्त्वाची बाब म्हणजे मानवी हक्काचे प्रश्न सुटत नाही. जबरदस्तीने बेपत्ता करणे, लष्करी कारवाया आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याच्या अहवालांमुळे असंतोष वाढला आहे.
- त्याचबरोबर बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) सारखे अनेक बलुच राष्ट्रवादी आणि फुटीरतावादी गट 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून अधिक स्वायत्तता किंवा पाकिस्तानपासून स्वातंत्र्यासाठी लढत आहेत.
बलुचिस्तानात किती संघटना कार्यरत?
बलुचिस्तानात प्रामुख्याने स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या तीन संघटना कार्यरत आहेत. त्यातील पहिली संघटना बलुच लिबरेशन आर्मी (BLA), बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) आणि तिसरी संघटना आहे बलुच रिपब्लिकन आर्मी (BRA)
या गटांना पाकिस्तान अनेकदा दहशतवादी संघटना म्हणून लेबल लावते, परंतु ते स्वतःला स्वातंत्र्यसैनिक मानतात आणि त्यांचा लढा सातत्याने लढत आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीचा इतिहास
- 1947 मध्ये जेव्हा पाकिस्तानची स्थापना झाली तेव्हा बलुचिस्तान एक स्वतंत्र राज्य होते, परंतु 1948 मध्ये पाकिस्तानने ते जबरदस्तीने आपल्यात समाविष्ट केले. बलुचिस्तानचे लोक त्यांच्या राजकीय आणि सांस्कृतिक ओळखीसाठी संघर्ष करत होते.
- 1970 च्या दशकात, बलुच राष्ट्रवादींनी पाकिस्तानपासून वेगळे होण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. 1970 मध्ये पाकिस्तानने एक मोठी लष्करी कारवाई सुरू केली आणि अनेक बलुच नेते आणि समुदायांचा छळ करण्यात आला. मग अनेक बलुच गटांनी सशस्त्र बंडाचा मार्ग निवडला.
- पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराला तोंड दिल्यानंतर 1970 मध्ये बलुच नेते मीर हबत खान मारी आणि त्यांचा मुलगा नवाब खैर बख्श मारी यांनी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ची स्थापना केली होती असे म्हटले जाते.
- 2000 नंतर, बीएलएने सशस्त्र संघर्ष सुरू केला, जो आजही सुरू आहे. 2018 पासून, बीएलए पाकिस्तानमध्ये सतत आत्मघातकी हल्ले करत आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications