Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानची चिंता वाढणार! रशिया भारताला देणार आणखी 'या' मिसाईल सिस्टिम्स, 4 वर्षात एवढी शस्त्र खरेदी

S-400 Russia to give India more missile systems : रशियाने भारताला कच्च्या तेलामध्ये सवलत दिल्यानंतर, आता आणखी S-400 क्षेपणास्त्र प्रणाली (मिसाईल सिस्टिम) पुरवण्यावर चर्चा सुरू केली आहे. रशियाच्या लष्करी-तांत्रिक सहकार्य सेवेचे प्रमुख दिमित्री शुगायेव यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, भारत आधीपासूनच S-400 चा वापर करत असून, नवीन पुरवठ्यासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

S-400 Russia to give India more missile systems

विशेष म्हणजे ही तिच एस-400 प्रणाली आहे ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलिकडच्या संघर्षात पाकचा प्रत्येक हल्ला या प्रणालीने परतावून लावला होता. भारताने सिंदूर ऑपरेशन राबवत पाकमधील दहशतवाद्यांची तळं उद्धवस्त केली. ही कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर करण्यात आली होती. भारतावर अनेक मिसाईलचा मारा पाकने केला होता पण त्यांचा एकही मारा यशस्वी होऊ शकला नाही, त्यामुळे पाकचे भारताने या प्रणालीच्या जोरावर हवाई हल्ले रोखले आणि पाकला उघडे पाडले त्यांचे लष्करी सामर्थ्य किती कुचकामी आहे हेही जगाला दिसले.

पाकला चिंता

रशिया आणि भारत या उभय राष्टांमध्ये आता आणखी S-400 क्षेपणास्त्र प्रणाली (मिसाईल सिस्टिम) पुरवण्यावर चर्चा सुरू आहे. या चर्चेने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे कारण भविष्यात जर पाकने हल्ले केले तर या प्रणालींची संख्या भक्कम होईल आणि भारताच्या बचाव सामर्थ्यात आणखी भर पडेल परिणामी पाकचे हल्ले निष्प्रभ ठरु शकतील त्यामुळे पाकिस्तानला चिंता सतावत आहे.

काय आहे कराराची पार्श्वभूमी?

  • २०१८ मध्ये भारताने चीनची वाढती लष्करी ताकद पाहता रशियाकडून पाच S-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी ५.५ अब्ज डॉलरचा करार केला होता.
  • हा करार पूर्ण होण्यास विलंब झाला असून, शेवटच्या दोन युनिट्स २०२६ आणि २०२७ मध्ये मिळण्याची शक्यता आहे.
  • अमेरिका सातत्याने दबाव आणत असूनही, भारताने रशियाकडून शस्त्रे खरेदी करणे थांबवलेले नाही, ज्याचे रशियाने कौतुक केले आहे.

भारत-रशियातील मजबूत संरक्षण भागीदारी

फ्रान्स आणि इस्त्रायलकडून खरेदी वाढली असली, तरी रशिया अजूनही भारताचा मुख्य शस्त्रे पुरवठादार देश आहे. २०१० ते २०१४ च्या दरम्यान भारताच्या एकूण शस्त्र आयातीपैकी ३६% हिस्सा रशियाचा होता. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून धोरणात्मक भागीदारी असून, अनेक संरक्षण प्रकल्पांवर ते एकत्र काम करत आहेत.:

टी-९० रणगाडे आणि सुखोई-३० एमकेआय विमानांचे उत्पादन

  • मिग-२९ आणि कामोव्ह हेलिकॉप्टरचा पुरवठा.
  • आयएनएस विक्रमादित्य विमानवाहू नौका (पूर्वीची ॲडमिरल गोर्शकोव्ह).
  • भारतातील एके-२०३ रायफलचे उत्पादन.
  • ब्रह्मोस क्षेपणास्त्र कार्यक्रम

S-400 ची प्रभावी कामगिरी

मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानविरुद्ध यशस्वी कारवाई केली. या कारवाईमध्ये S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने अनेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आणि नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या पार्श्वभूमीवर, भारताला या संरक्षण प्रणालीचा अतिरिक्त पुरवठा मिळाल्यास पाकिस्तानची चिंता वाढू शकते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+