पंतप्रधान संविधानावर हल्ला करताहेत हे जनतेला स्पष्ट कळलंय! राहुल गांधीची युएसएमध्ये PM मोदींवर टीका

Rahul Gandhi Speech: " भारतीय संविधानात भाषांचा आदर, संस्कृतीचा आदर, जातीधर्मांचा आदर याला मोठं स्थान आहे. पण भारताचे पंतप्रधान हे संविधानावर हल्ला करत आहेत" अशी टीका करत भाजपचे हे धोरण भारतातील जनतेला स्पष्टपणे कळालं आहे. "आता भाजपची भिती नाहीशी झाली असून हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही मिनिटांतच ही गोष्ट स्पष्ट झाली," असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, त्यांनी आज आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका केली.

Rahul Gandhi Speech

भाषा, राज्य आणि संस्कृतीवर हल्ला होतोय..

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आमचा विश्वास आहे की भारत हा अनेक विचारांचा देश आहे. भाजप आपल्या भाषा, राज्य, इतिहास आणि संस्कृतीवर हल्ला करत आहे.

हा संविधान वाचवण्याचा लढा

राहुल गांधी म्हणाले, आमचा असा विश्वास आहे की, कुणाची जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास काहीही असो प्रत्येकाला ज्याचे त्याचे स्थान आणि सहभागी होण्याची संधी मिळायला पाहिजे, स्वप्न पाहण्यासाठी संधी मिळायला हवी. भारतातील लाखो लोकांना हे स्पष्टपणे समजले की भारताचे पंतप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत आणि हा संविधान वाचवण्याचा लढा आहे.

अभयमुद्रा निर्भयतेचे प्रतिक

राहुल गांधी म्हणाले की, मी तुम्हाला सांगितलेला प्रत्येक शब्द संविधानात आहे, जे लोकांना निवडणुकीत स्पष्टपणे समजले आहे. जो कोणी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे तो भाजप पक्ष आहे. परंपरा आणि राज्यांना लक्ष्य करत आहे, इतिहासावरही हल्ला केला आहे, हेही लोकांना समजले आहे. म्हणूनच संसदेतील माझ्या पहिल्या भाषणात मी अभयमुद्रेचे वर्णन करताना तुमच्या लक्षात आलेच असेल, की हे निर्भयतेचे प्रतीक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे.

भाजपची भिती नाहीशी झालीय..

राहुल गांधी म्हणाले, मी जेव्हा हे सांगत होतो, तेव्हा भाजप हे करू शकले नाही. आता आम्ही त्यांना समजावणार आहोत. निवडणूक निकालाच्या काही मिनिटांतच, दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपची भीती नाहीशी झाली.भारतात भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना कोणीही घाबरले नाही, हे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे हे मोठे यश आहे, हे भारतातील लोकांचे मोठे यश आहे ज्यांनी लोकशाहीची जाणीव करून दिली. ज्या भारतीय जनतेला हे समजले की आपण संविधानावरील हल्ला स्वीकारणार नाही.(Rahul Gandhi Speech )

काय म्हणाले सॅम पित्रोदा?

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष, सॅम पित्रोदा म्हणाले, "राहुल गांधींचा अजेंडा काही मोठ्या मुद्द्यांकडे लक्ष देणे हा आहे, भाजप करोडो रुपये खर्च करून ज्या गोष्टींचा प्रचार करत आहे त्याच्याविरुद्ध राहुल गांधी यांचा दृष्टीकोन आहे. मला सांगायलाच हवे की, ते 'पप्पू' नाहीत, ते उच्चशिक्षित आहे, कोणत्याही विषयावर सखोल विचार करणारे रणनीतीकार आहे..."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+