Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानचा पुन्हा जुना सूर, काश्मीर कधीही भारताचा भाग होऊ शकत नाही- शाहबाज शरीफ यांनी विष ओकले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबाबत भारताविरुद्ध भाष्य केलं आहे. शरीफ म्हणाले की, काश्मीर मुद्द्यावर भारताशी अर्थपूर्ण चर्चेद्वारे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. बुधवारी मुझफ्फराबाद येथे काश्मीर एकता दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान भारताशी चर्चेद्वारे काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवू इच्छितो. शरीफ यांनी यावेळी काश्मिरी जनतेला पाठिंबाही व्यक्त केला आहे.

pakistan pm shehbaz sharif

काश्मीर कधीही भारताचा भाग होऊ शकत नाही

'या संघर्षात आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत. जोपर्यंत त्यांना त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते करत राहू',असं शाहबाज यांनी म्हटलं आहे. '5 फेब्रुवारी हा दिवस भारताला आठवण करून देतो की काश्मीर कधीही भारताचा भाग होऊ शकत नाही.

मुहम्मद अली जिना यांनी काश्मीरला पाकिस्तानचा महत्त्वाचा घटक घोषित केल्याचा उल्लेख करून त्यांनी यावर भर दिला. या प्रदेशाची स्थिती संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि तेथील लोकांच्या इच्छेनुसार सोडवली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. .

भारताने संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत

शाहबाज यांनी भारतीय संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा उल्लेख करत म्हटलं आहे की, भारताने 5 ऑगस्ट 2019 च्या मानसिकतेतून बाहेर पडून संयुक्त राष्ट्रांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि चर्चा सुरू करावी. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय संविधानातील कलम 370 रद्द केले होते. तसेच, तत्कालीन राज्य दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे.

शहबाज यांनी दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहिली

दरम्यान पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या २४ कोटी जनतेच्या वतीने काश्मिरींसोबत एकता व्यक्त केली आहे. त्यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पाकिस्तान काश्मिरींप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेपासून कधीही मागे हटणार नाही, असं म्हटलं आहे. शाहबाज यांनी काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या उपस्थितीचा निषेध केला आणि काश्मिरींवर होणाऱ्या कथित अत्याचाराचा जुना सूर गिरवल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+