Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कारगिल युद्धात इस्रायलची भारताला मदत; भारताकडून 'अशी'परतफेड

भारत इस्राइलचे मैत्रीपूर्ण संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जागतिक पातळीवर या दोन्ही देशांचे सहकार्याचे संबंध पाहायला मिळतात. कारगिल युद्धाच्या कठीण काळात इस्रायलने भारताला मोठ्या प्रमाणात मदत केली होती. आता भारत त्याचीच परतफेड करत आहे. याच संदर्भात सविस्तर.

pm narendra modi

15 मे रोजी एक मालवाहू जहाज स्पेन नजीकच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे होते. तर समुद्र तटावर काही लोक आंदोलन करत होते. हे प्रदर्शन करणारे लोक पॅलेस्टाईन समर्थक होते. जहाजात नेमका काय माल आहे, याची तपासणी करा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. हा काळ इस्रायल - गाझा - पॅलेस्टाईन युद्धा दरम्यानचा होता. पॅलेस्टाईन समर्थकांना शंका होती की, जे जहाज समुद्रमार्गे इस्रायलला जात असून त्यामध्ये शस्त्रे आहेत.विशेष म्हणजे स्पेनच्या राजकीय वर्तुळातील याची तपासणी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. काही माध्यम संस्था, वृत्तपत्रांनी यावर भाष्य केले होते.

चर्चा अशी होती की, हे जहाज भारताच्या चेन्नई समुद्र किनाऱ्यावरून निघून इस्रायलकडे जात आहे. आणि भारत इस्रायलला शस्त्रपुरवठा करत आहे. स्पेन सरकार तपासाची चक्रे फिरविणार इतक्यात हे जहाज स्लोव्हेनिया बंदराकडे रवाना झाले होते.

जहाजात भारताचा शस्त्रसाठा?

जहाजात भारताचा शस्त्रसाठा असून हा साठा इस्रायलकडे जात आहे. या शंकेची इथे शहानिशा झाली. इतकंच नव्हे तर हे शस्त्रे आणि दारूगोळा 'मेड इन इंडिया' असल्याचं म्हटलं गेलं. पुढे इस्रायलच्या असुदोद किनाऱ्यावर हे शस्त्रे उतरवली गेल्याची चर्चा आहे.

भारताची इस्रायलला मदत, कुणाचं टेन्शन वाढलं?:

अल जजिराच्या रिपोर्टनुसार अहिंसेचे समर्थन करणाऱ्या भारताची भूमिका काही काळापासून बदलत राहिली आहे. शिवाय युद्धभूमीच्या परिसरात मेड इन इंडियाचे काही अवशेष सापडल्याचा दावाही केला जात आहे. इस्लामिक राष्ट्रांना ही मोठी चेतावणी असल्याचं म्हटलं जातं आहे.

कारगिलच्या युद्धातील मदतीची परतफेड?

कारगिल युद्धाच्या काळात पाकिस्तानी सैन्य पुढे सरकत असताना इस्रायलने भारताला अनेक शस्त्र पुरवली होती. याच मदतीची परतफेड भारताने केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी आणि नेतान्याहू यांच्या काळात या दोन्ही राष्ट्रांचे संबंध अधिक घट्ट झाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+