Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत की पाकिस्तान कुठला वक्फ बोर्ड जास्त श्रीमंत, घ्या जाणून

Waqf Amendment Bill : आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक 2025 सादर करण्यात आले. भाजपनं याला मुस्लिम समुदायाच्या विकासासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक क्षण म्हटलं आहे, तर केंद्र सरकारने या विधेयकातून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकार मशिदींच्या व्यवस्थापनात किंवा धार्मिक कार्यात हस्तक्षेप करणार नाही, असं लोकसभेत हे विधेयक सादर करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

केंद्रीय वक्फ बोर्डात किमान दोन महिला सदस्य आणि राज्य वक्फ बोर्डात एक महिला सदस्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही जाती किंवा धर्मामुळे खासदार झालो नाही. तुमची एक ट्रस्ट आहे, ती ट्रस्ट धर्मादाय आयुक्तांद्वारे व्यवस्थापित केली जाते. जर व्यपस्थापन सांभाळणारी व्यक्ती मुस्लिम नसेल तर तो ते कसे हाताळू शकेल असे तुम्ही कसे म्हणू शकता?

waqf board

वक्फ बोर्ड बहुतेक देशांमध्ये काम करते जिथे मुस्लिम समुदायाचे लोक राहतात, ज्यात इराण, इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया, मलेशिया, भारत, बांगलादेश, इजिप्त, तुर्की आणि अल्जेरिया यांचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये ते धार्मिक संघटना किंवा राज्यांच्या विविध समित्यांच्या अधीन असते. एका अहवालानुसार, जगभरातील वक्फ मालमत्तांपैकी 90% पेक्षा जास्त मालमत्ता इमामबारा, कब्रस्तान, मशिदी आणि दर्ग्यांच्या स्वरूपात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे एकूण 3804 चौरस किलोमीटर जमीन आहे. तर पाकिस्तानमध्ये वक्फ बोर्डाकडे अंदाजे 8 लाख 81 हजार 913 चौरस किलोमीटर जमीन आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानकडे भारतापेक्षा 200 पट जास्त जमीन आहे. वक्फची प्रथा भारतात पहिल्यांदाच मुघल काळात सुरू झाली. यामागील राज्यकर्त्यांचा हेतू त्यांची धार्मिक बांधिलकी दाखवणे आणि जनतेला सुविधा पुरवणे हा होता.

पाकिस्तानी माध्यमांनुसार, त्यांच्या देशातील वक्फ मालमत्तांची देखभाल आणि कामकाज इस्लामाबाद आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत येते. जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे वक्फ हे इस्लामिक कायद्यातून म्हणजेच शरियातून घेतलेले तत्व आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपली मालमत्ता धर्मादाय, सामुदायिक किंवा धार्मिक कारणांसाठी कायमची दान करते. इस्लामिक कायद्यात अशी मालमत्ता कोणत्याही वैयक्तिक मालकीच्या बाहेर जाते आणि नंतर ती अल्लाहची मालमत्ता मानली जाते.

भारतातील प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड आहे जो वक्फ मालमत्तांवर नियंत्रण ठेवतो. देशातील पाच राज्यांमध्ये वक्फकडे सर्वाधिक मालमत्ता आहेत. उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक मालमत्ता आहेत. एकट्या हैदराबादमध्ये वक्फकडे 77 हजार मालमत्ता आहेत, म्हणूनच या शहराला भारताची वक्फ राजधानी म्हटले जाते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात वक्फच्या 1 लाख 20 हजार मालमत्ता आहेत. तेलंगणाचे वक्फ बोर्ड हे देशातील सर्वात श्रीमंत वक्फ बोर्ड आहे. तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजेच 1 लाख 50 हजार मालमत्ता आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+