भारताला कोंडीत पकडण्याचा डाव पाकिस्तानवरच उलटला; पाकड्यांचे झाले करोडोंचे नुकसान, नेमकं काय घडलं!
Pakistan Latest News : काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला.
भारताला कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला आहे. पाकिस्तानच्या या आडमुठेपणामुळे भारताला सुमारे 127 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा होत असला, तरी पाकिस्तानला मात्र त्यापेक्षाही मोठा फटका बसल्याचे समोर येत आहे.

भारताच्या कोंडीचा पाकिस्तानलाच फटका
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार केला. केंद्र सरकारने सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पाकिस्तान हादरला. या निर्णयाचा निषेध म्हणून पाकिस्तानने 24 एप्रिल रोजी भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले.
यामुळे भारतीय विमानांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागला आणि इंधन व वेळेचा अतिरिक्त खर्च झाला. या कारणामुळे अवघ्या दोन महिन्यांत भारताला सुमारे १२७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु, पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय त्यांच्याच अर्थव्यवस्थेसाठी अधिक नुकसानकारक ठरला आहे.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय सभेला दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल ते 30 जून या कालावधीत विमान वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. त्यांच्या वाहतूक वाहतुकीत तब्बल 20% घट झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हद्दीच्या बंदीमुळे त्यांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
पूर्वीच्या निर्णयाचाही झाला होता मोठा तोटा
याआधीही, 2019 साली बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. तेव्हाही पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आला होता.
या एका चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तानला त्यावेळी २३५ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले होते. भारताला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतल्याचे त्यावेळी सिद्ध झाले होते.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय हा कोणताही मोठा आर्थिक तोटा नसून केवळ "महसुलातील घट" आहे.
परंतु, वारंवार अशा प्रकारे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांमध्ये पाकिस्तानबद्दल नकारात्मक संदेश जातो, ज्यामुळे भविष्यातही त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
भारत-पाकिस्तान यांच्यातील सद्यस्थिती कशी?
सध्या भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी एकमेकांसाठी हवाई हद्द बंद ठेवली आहे. भारताने 23 ऑगस्टपर्यंत हवाई हद्द बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्ताननेही या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही बंदी कायम ठेवली आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की भारताला हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान आपलेच मोठे नुकसान करून घेत आहे.
त्यांच्या या बालिश आणि राजकीय हेतूने प्रेरित निर्णयामुळे जागतिक स्तरावर त्यांची प्रतिमा अधिकच खालावत चालली आहे. भारताशी वैर घेण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी कमकुवत होत आहे, हेच यातून सिद्ध होते.












Click it and Unblock the Notifications