तब्बल ७०० नागरिकांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराला जाग; ३० दहशतवादी ठार
गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये दहशतवाद्यांनी पाकिस्तानला खिळखिळे केले होते. तेहरिक-ए- तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीने पाकिस्तानात अनेक हल्ले केले. गेल्यावर्षी टीटीपीने पाकिस्तानात तब्बल ४४४ दहशतवादी हल्ले करुन ६८५ पाकिस्तानी नागरिकांचा बळी घेतला होता. आता अखेर पाकिस्तानचे लष्कर जागे झाले असून, काल तीन ठिकाणी केलेल्या कारवायांत ३० दहशतवादी ठार केल्याचा दावा केला जात आहे.

टीटीपीविरोधात कारवाई
पाकिस्तानात गेल्या काही महिन्यांत तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानला लक्ष केले होते. त्यांनी पाकिस्तानला खिळखिळे केले होते. CRSS च्या रिपोर्टनुसार, 2024 या वर्षी टीटीपीने पाकिस्तानात 444 दहशतवादी हल्ले केले. त्यात 685 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने टीटीपी विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. दहशतवादाविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी दिला होता.
३० दहशतवादी मारले
खैबर पख्तूनख्वा प्रांतात तीन वेगवेगळ्या दहशतवादविरोधी कारवायांमध्ये 30 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराने आज दिली. पाकिस्तानमधील लक्की मारवत, करक आणि खैबर जिल्ह्यांमध्ये लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. लक्की मारवत जिल्ह्यात 18 दहशतवाद्यांना तर करकमध्ये आठ दहशतवाद्यांना मारण्यात आले. लक्की मारवत चकमकीत सहा दहशतवादी जखमी झाल्याचे लष्कराने एका निवेदनात नमूद केलं.
शस्त्रास्त्रे केली जप्त
या तिन्ही ठिकाणांवरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी खैबर जिल्ह्यातील तिराह भागात गुप्तचरांवर आधारित कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले होते. तर खैबर जिल्ह्यातील बाग भागात झालेल्या आणखी एका चकमकीत सुरक्षा दलांनी नेता अझीझ उर रहमान उर्फ कारी इस्माईल आणि मुखलिस यांच्यासह चार दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराने केलेल्या या कारवाईत दोन दहशतवादी जखमी झाले होते.












Click it and Unblock the Notifications