Bangladesh Election 2026 : बांगलादेश निवडणुकीत हिंदू उमेदवारांची संख्या किती?, वाचा संपूर्ण राजकारण
Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. १३ व्या राष्ट्रीय संसद निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून एकूण १,९८१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, या निवडणुकीच्या राजकीय झगमगाटात एक विदारक वास्तव समोर आले आहे-ते म्हणजे अल्पसंख्याक हिंदू समाजाची सुरक्षितता आणि राजकारणातील त्यांचा नगण्य सहभाग.

१,९८१ उमेदवारांमध्ये अल्पसंख्याक किती?
बांगलादेशच्या एकूण २९८ संसदीय जागांवर निवडणूक होत आहे. धक्कादायक बाब अशी की, लोकसंख्येचा मोठा हिस्सा असूनही केवळ ८० अल्पसंख्याक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २२ राजकीय पक्षांनी एकूण ६८ अल्पसंख्याक उमेदवार उभे केले आहेत. १२ उमेदवार अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. एकूण उमेदवारांमध्ये केवळ १० महिलांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPB) सर्वाधिक १७ अल्पसंख्याक उमेदवार उभे केले आहेत. तर, कट्टरपंथी विचारसरणीच्या जमात-ए-इस्लामीने पहिल्यांदाच कृष्णा नंदी या हिंदू उमेदवाराला तिकीट देऊन सर्वांना चकित केले आहे. अवामी लीगच्या माघारीमुळे यावेळी निवडणुकीची संपूर्ण गणिते बदलली आहेत.
रक्ताळलेली निवडणूक: हिंदूंवरील हल्ल्यांचे सत्र
निवडणूक जवळ येत असताना बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत १० हून अधिक हिंदूंच्या हत्या झाल्या असून, त्यांच्या घरांवर आणि मंदिरांवर सतत हल्ले होत आहेत. यामुळे संपूर्ण समुदायात भीतीचे वातावरण आहे.
'हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल'ने या घटनांमागे जाणीवपूर्वक केलेला राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. कौन्सिलचे नेते मनिंद्र कुमार यांच्या मते, "पोलिस आणि प्रशासन हे हल्ले रोखण्यात जाणीवपूर्वक अपयशी ठरत आहेत." सरकार याला वैयक्तिक वादाचे स्वरूप देऊन दुर्लक्ष करत असले तरी, जमिनीवरचे वास्तव मात्र दहशतीचे आहे.
'व्होट बँक' की राजकीय नेतृत्व?
अल्पसंख्याक नेत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे-आम्ही फक्त मतपेढी आहोत का? ख्रिश्चन असोसिएशनचे निर्मोल रोजारियो म्हणतात की, जोपर्यंत अल्पसंख्याकांना राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या हक्कांचे रक्षण होणार नाही.
"राजकीय पक्ष आम्हाला फक्त 'मतदार' म्हणून पाहतात, 'नेते' म्हणून नाही. २९८ जागांवर केवळ ८० उमेदवारांची उपस्थिती ही मुख्य प्रवाहातील राजकारणात असलेल्या आमच्या मर्यादित पोचचे द्योतक आहे."
राजकीय आरोप-प्रत्यारोप अन् हिंदूंची सुरक्षा
निवडणुकीच्या रॅलींमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बीएनपीचे (BNP) तारिक रहमान आणि जमातचे शफीकुर रहमान यांनी जुन्या हिंसाचाराचे आणि 'मत चोरी'चे मुद्दे उपस्थित करून सत्तेवर टीकास्त्र सोडले आहे. तारिक रहमान यांनी धार्मिक आधारावर मते मागणाऱ्यांचा निषेध केला असला तरी, या मोठ्या नेत्यांच्या संघर्षात सामान्य हिंदू नागरिक मात्र भरडला जात आहे.
निवडणुकीच्या दिवशी किंवा निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची भीती अल्पसंख्याक समुदायाला वाटत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अल्पसंख्याकांचा आवाज आणि त्यांचे अस्तित्व सुरक्षित राहणार का, हा मोठा प्रश्न आज बांगलादेशसमोर उभा आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications