जागतिक लोकसंख्या दिन : फाळणीवेळी किती होती भारत, पाकिस्तानची लोकसंख्या? आता किती घ्या जाणून
मुंबई - जगात तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे भारत वाटतचाल करीत असतानाच लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा सर्वात मोठा देश आहे. स्वातंत्र्यानंतर भारताच्या लोकसंख्येत सुमारे ११० कोटींची भर पडली. तर पाकिस्तानी लोकसंख्या आज तब्बल २४ कोटींवर पोहचली असून जगात सर्वात जास्त लोकसंख्येत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची वाढ होताना दिसून येत आहे.
७२ वर्षांचा लोटला काळ
भारत व पाकिस्तानला एकाच वेळी स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या काळात दोन्ही देशांत कमालीचे बदल झाले. भारताचा जगात गवगवा पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पाकिस्तान आर्थिक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

एका बाजूला भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या रुपात स्थापित झाल्याचे दिसते, तर दुसरीकडे पाकिस्तानात लोकशाहीची सुरुवातच डगमगून झाली. आता तर अधोगती पाहायला मिळत आहे. १९४७ नंतर १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये दोन्ही देशांमध्ये चार युद्धे झाली. तसेच उर्वरित काळातही दोन्ही देशांतील संबंध अविश्वास आणि कटुतेने परिपूर्ण असेच राहिले.
स्वातंत्र्यावेळी अन् आताची लोकसंख्या
स्वातंत्र्यापासूनच दोन्ही देशांच्या लोकसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली. १९४७ मध्ये भारताची लोकसंख्या जवळपास ३९ कोटी होती, जी आज सुमारे ३५० टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे पाकिस्तानची लोकसंख्या आज २४ कोटींवर पोहोचलीआहे. गेल्या ७२ वर्षांत त्यात ५०० टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसते. या दोन देशांची लोकसंख्या वाढ गतीने होत असल्याचेही पुढे येत आहे.
1921 मध्ये किती होती भारताची लोकसंख्या?
1921 मध्ये भारताच्या सध्याच्या सीमेमध्ये (म्हणजे आताचे पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता) एकूण लोकसंख्या 251 दशलक्ष होती आणि 1947 मध्ये, स्वातंत्र्याच्या वेळी, ती सुमारे 340 दशलक्ष होती. 1951 ते 2017 दरम्यान, पाकिस्तानची लोकसंख्या सहापटीने वाढली, 33.7 दशलक्ष वरून 207.7 दशलक्ष झाली.
देशात तुलनेने उच्च, जरी घट होत असली तरी वाढीचा दर उच्च जन्मदर आणि कमी मृत्यू दराने समर्थित आहे. 1998 आणि 2017 दरम्यान, सरासरी वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर +2.40% होता.
फाळणीनंतर किती लोक भारतात आले
फाळणी, झाली तेव्हा 15 दशलक्षाहून अधिक लोक पाकिस्तानात गेले. तर सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबर 1947 च्या उत्तरार्धात केवळ 42 दिवसांत सुमारे 85 लाख निर्वासित पाकिस्तानातून भारतात आले. हे जगातील सर्वात मोठे स्थलांतर ठरल्याचे बोलले जाते.
आज किती आहे या दोन देशांची लोकसंख्या
2023 च्या जनगणनेच्या अंतिम निकालानुसार पाकिस्तानची लोकसंख्या 24 कोटी 14 लाख 92 हजार 197 होती. या आकड्यामध्ये पाकिस्तानच्या चार प्रांतांचा समावेश आहे (पंजाब, सिंध, केपीके, बलुचिस्तान आणि इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी) पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.
भारतात आजच्या घडीला 1 अब्ज 44 कोटी 17 लाख 19 हजार 852 आहेत हीच लोकसंख्या 2023 साली 1 अब्ज 42 लाख 86 लाख 27 हजार 663 इतकी आहे. एक वर्षात भारताची लोकसंख्या १ कोटी ३० लाख ९२ हजार १८९ ने वाढली आहे.
..म्हणून वाढतेय लोकसंख्या
लोकसंख्यावृद्धीला प्रभावित करणारे एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सरासरी आयुर्मानात वाढ होणे ही आहे. फाळणी वेळी, भारतीयांचे सरासरी आयुर्मान केवळ ३२ वर्षे इतकेच होते. परंतु, गेल्या सात दशकांत भारत आणि पाकिस्तानने आरोग्यविषयक सेवेत चांगली प्रगती केली. परिणामी, आज भारतीयांचे सरासरी आयुर्मान ६८ वव पाकिस्तानी नागरिकांचे ६६ वर्षे सरासरी आयुर्मान झाले आहे.
संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध
संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध आणि त्यापासून बचावासाठी लसीकरण, पोषक आहार तसेच उपचारांच्या चांगल्या सुविधांमुळे मृत्युदरात घट झाली आहे. तसेच नवजात अर्भक आणि बालमृत्युदरातही घट झाली आहे, पण ती पुरेशी नाही. भारतात अर्भक मृत्युदर हजारी जन्मामागे ३८, तर पाकिस्तानात ६६ इतका आहे. पाकिस्तानचा अर्भक मृत्यूदर आशियात सर्वाधिक आहे.












Click it and Unblock the Notifications