Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Womens Day 2025 : देशातील या 10 महिलांनी प्रथम सर्वोच्च पदांवर पोहोचून रचला इतिहास

Womens Day 2025 : महिलांचा सन्मान व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक महिलेला त्यांच्या कामासाठी, हक्कांसाठी आणि समानतेसाठी प्रोत्साहन देतो. महिलांचे कार्य, दयाळूपणा, कामगिरी आणि योगदान यांचे स्मरण करून हा प्रसंग साजरा केला जातो.

आज पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून चालण्यास काम करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. महिलांनी मोठ्या पदांवर मोठ्या अभिमानाने जबाबदारी घेतली आहे. आज आपण अश्याच महिलांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी देशात पहिल्यांदाच एखाद्या पदावर विराजमान होऊन इतिहास रचला आहे.

Indira Gandhi

1. प्रतिभा पाटील

प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. 2007 ते इ.स. 2012 मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी आपला कार्यकाळ अतिशय चांगल्या आणि धैर्याने हाताळला आहे.

2. इंदिरा गांधी

देशाच्या राजकारणात एक खास ओळख निर्माण करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी या 1966 मध्ये देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात तीन वेळा पंतप्रधानपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मोठे राजकीय निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयाची अनेकदा भारतीय राजकारणात चर्चा होते.

3. मीरा कुमार

काँग्रेसचे दिवंगत नेते जगजीवन राम यांच्या कन्या मीरा कुमार या देशाच्या पहिल्या महिला सभापती आहेत. मीरा कुमार यांनी 2009 सासाराम मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यावेळी मीरा कुमार यांची यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या देशातील पहिल्या महिला सभापती बनल्या आहेत.

4. राजकुमारी अमृत कौर

राजकुमारी अमृत कौर या स्वतंत्र देशाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

5. सुचेता कृपलानी

सुचेता कृपलानी यांनी 1963 मध्ये उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. त्या देशातील पहिल्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यचा कारभार सांभाळला आहे. 1963-67 पर्यंत उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.

6. सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. देशाच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांनी राज्यपाल पद भूषवलं आहे. 1947 ते 1949 पर्यंत त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल होत्या. नायडूंच्या कवितेत लहान मुलांच्या कविता आणि देशभक्ती यासह अधिक गंभीर विषयांवर लिहिलेल्या दोन्ही कवितांचा समावेश आहे. 1912 मध्ये प्रकाशित, "इन द बाजार्स ऑफ हैदराबाद" ही त्यांची सर्वात लोकप्रिय कविता आहे.

7. फातिमा बीबी

फातिमा बीवी या इ.स. 1989 मध्ये भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. भारतातून एवढ्या मोठ्या पोस्टवर जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. फातिमा बीवी यांचे पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असे आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी केरळ मधल्या पतनमतिट्टा या गावात झाला.

8. अण्णा राजम मल्होत्रा

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अण्णा राजम मल्होत्रा ​​या पहिल्या महिला आयएएस अधिकारी होत्या. अण्णा राजम यांचा जन्म 1927 मध्ये केरळमधील एरनाकुलम येथे झाला. 1995 मध्ये त्यांनी नागरी सेवांसाठी जाण्याचा निर्णय घेतला. 1951 मध्ये त्यांनी एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिची निवड झाली.

9. किरण बेदी

किरण बेदी यांना देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाते. किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये 80 पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. किरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. 1994 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

10. सरला ठकराल

सरला ठकराल या विमान उडवणा-या पहिल्या भारतीय महिला आहेत. 1936 साली त्यांनी म्हणजेच 21 व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+