काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष का केला नाही? PM मोदींचा काँग्रेसला सवाल, सडेतोड भाषणातील 5 मुद्दे वाचा
PM Modi : "काँग्रेसने केवळ काही कट्टरपंथीयांना खूश केले. उर्वरीत समाज दयनीय, अशिक्षित आणि गरीब राहिला. काँग्रेसच्या या वाईट धोरणाचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे वक्फ कायदा होय. त्यांनी काही कट्टरवाद्यांनाच खूश केले आहे अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 एप्रिल 2025 रोजी हिसार विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी संबोधित रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि त्यांच्या धोरणावर जोरदार निशाणा साधला.

1. डाॅ आंबेडकरांच्या स्वप्नावर काँग्रेसकडून वार - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेल्या स्वप्नावर काँग्रेसने वार केला आहे, त्यांनी संविधानात केलेली तरतूद, सामाजिक न्यायाच्या तरतुदीत बदल घडवून आणला आहे.
2. काँग्रेसने एखाद्या मुस्लिम व्यक्तिला अध्यक्ष का केले नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हिस्सारमध्ये आयोजित सभेत हल्लाबोल केला. ते म्हणाले, बाबासाहेब समानतेच्या तत्वावर चालणारे होते परंतु, काँग्रेसने मतांच्या राजकारणाचा व्हायरस देशात पसरवला. काँग्रेसने आजपर्यंत एखाद्या मुस्लिम व्यक्तीला आपल्या पक्षाचा अध्यक्ष का नाही बनवत आणि निवडणुकीत 50 टक्के मुस्लिम उमेदवाराला तिकीट का देत नाही असा सवालही केला आहे.
3. "सत्तेसाठी काँग्रेसने संविधानाला बनवले शस्त्र"
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने आमच्या पवित्र संविधानाला शस्त्र बनवले. जेव्हा-जेव्हा काँग्रेसवर सत्तेचे संकट आले तेव्हा त्यांनी राज्यघटनेची पायमल्ली केली. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात राज्यघटनेचा आत्मा चिरडून टाकला. ज्यामुळे त्यांना कशीबशी सत्ता टिकवता येईल हा याचा उद्देश होता."
4. "वक्फच्या संपत्तीचा फायदा भुमाफियांना"
पीएम मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले आणि वक्फसंदर्भात काही भाष्य केली ते म्हणाले, "वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. वक्फ मालमत्तेचा लाभ गरजूंना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता. पण या संपत्तीचा फायदा भूमाफियांना झाला... या सुधारित वक्फ कायद्यामुळे गरिबांची लूट थांबेल.''
5. "आदीवासींच्या जमिनी सुरक्षित होतील"
पीएम मोदी म्हणाले, "आता नवीन वक्फ कायद्यानुसार, हे वक्फ बोर्ड भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही आदिवासीच्या जमिनीला किंवा मालमत्तेला हात लावू शकणार नाही. नवीन तरतुदी वक्फच्या पवित्र भावनेचा आदर करतील. मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा कुटुंबांना, महिलांना, विशेषत: मुस्लिम विधवा, मुलांना त्यांचे हक्क मिळतील आणि त्यांच्या हक्कांचेही संरक्षण होईल. हाच खरा सामाजिक न्याय आहे."












Click it and Unblock the Notifications