What is LOC : नियंत्रण रेषा म्हणजे काय? युद्ध विराम काय असतो, जाणून घ्या ए टू झेड माहिती?
What is LOC what is ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष दोन्ही देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत सुरु आहे. नियंत्रण रेषेचेही पाकिस्तानने वारंवार उल्लंघन केले तसेच शस्त्रसंधीचेही त्यांनी सतत उल्लंघन केले आहे. अशा स्थितीत भारत आतंरराष्ट्रीय पातळीवर वारंवार आपली बाजू मांडत आला आहे. यातच पहलगाम हल्ला ज्यावेळी झाला, तेव्हा मात्र पाकिस्तानने दहशतवाद्यांना सहकार्य करुन सर्व हद्द पार केली.

यानंतर भारताने सिंधू जलकरार संपुष्टात आणला तर पाकिस्तान शिमला करार संपुष्टात आणण्याची भाषा करत आहे. शिमला करारानुसार, दोन्ही देशांनी औपचारिकरित्या परस्पर सहमतीने एलओसी अर्थात नियंत्रण रेषेचा स्वीकार केला आहे, पण पाकिस्तानची कुरापत काही केल्या कमी होताना दिसत नाही. नियंत्रण रेषा ओलांडून त्यांचे सैनिक असो की, त्यांनी पोसलेले दहशतवादी असोत हे नियंत्रण रेषेचे आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आले आहेत, आज आपण नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत.
LOC म्हणजे काय?
- 1948 मध्ये LOC म्हणजेच नियंत्रण रेषा सुरू झाली.
- LOC म्हणजेच नियंत्रण रेषा ही अशी रेषा आहे जी आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केलेली नाही पण दोन्ही देश ती स्वीकारतात.
- दोन्ही देशांमधील संघर्षानंतर एलओसी म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल सुरू करण्यात आली.
- 1947 मध्ये दोन्ही देशांच्या फाळणीनंतर सातत्याने युद्धविराम झाला आणि त्यानंतर LOC अस्तित्वात आली.
- युद्धविराम झाल्यानंतरही पाकिस्तानने वारंवार नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले आहे.
- कालही पाकिस्तानी लष्कराचे समर्थन असलेले दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसले आणि त्यांनी पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांचे जीव घेतले.
- 1971 मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले आणि त्यानंतर 1972 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला.
- या करारातच दोन्ही देशांनी एलओसीचा औपचारिक स्वीकार केला.
नियंत्रण रेषा आणि देशाची सीमा एकच आहे की वेगळी?
- आंतरराष्ट्रीय सीमेवर बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी पोलिस दल तैनात असतात तर नियंत्रण रेषा वेगळी आहे. दोन्ही देशांचे सैन्य नियंत्रण रेषेवर तैनात असतात.
- नियंत्रण रेषा ही देशाची अधिकृत सीमा नसून लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेला भाग आहे, जो वादग्रस्त भागापासून दूर राहतो.
- नियंत्रण रेषेवर यथास्थिती राखण्याची जबाबदारी दोन्ही देशाची असते आणि युनायटेड नेशन्सच्या निरीक्षक गट शस्त्रसंधीवर लक्ष ठेवतो.
युध्दविराम किंवा शस्त्रसंधी म्हणजे काय?
मुळातः युद्ध कुणालाच परवडणारे नसते पण काही गोष्टींनी युद्धाला आपण थांबवू शकतो. युद्ध देशाच्या आर्थिक आणि इतर विकासाला खीळ आणते ते विध्वंसक असते. त्यामुळे उभय देश एकमेकांशी चर्चा करुन युद्धविराम करार करतात, किंवा एकमेकांविरोधात शस्त्र उचलणे टाळणे आणि युद्धजन्स स्थिती न उत्पन्न करणे हा त्यामागील उद्देश असतो.
2003 मध्ये, 25-26 नोव्हेंबरच्या रात्री, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर युद्धविराम जाहीर केला. लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी दोन्ही देशांना याची माहिती दिली आणि युद्धविराम करार लागू झाला.
2003 चा युद्धविराम करार लिखित नाही आणि 1949 आणि 72 मध्ये केलेले करार कायम ठेवण्याचे उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत कितीवेळा झाले शस्त्रसंधीचे उल्लंघन
2013 मध्ये भारताने पाकिस्तानवर 347 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. भारताने 464 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानने भारतावर केला होता. तेव्हापासून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मे 2018 मध्ये, भारताने रमजान युद्धविराम जाहीर केला, परंतु तो फार काळ टिकला नाही आणि 2019-20 मध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर पुन्हा युद्धविरामाचे उल्लंघन सुरू झाले.












Click it and Unblock the Notifications