Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्रात 'तुफान' थंडी! दिल्ली धुक्यात अन् तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळाचा कहर

Weather Update Severe cold in Maharashtra : महाराष्ट्रात दिवाळीनंतर थंडीची जोरदार लाट आली असून राज्याला या लाटेने गारेगार करुन टाकले आहे. हवामान विभागाकडून थंडीचा अलर्ट देण्यात आला हे. तर दुसरीडे दिल्ली धुक्यांचे जाळे कायम असून दक्षिण भारतात फेंगल वादळाचा कहर सुरुच आहे. भारतीय हवामान विभागाने तामिळनाडूत अलर्ट घोषित केला असून तेथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

डोंगराळ राज्यांमध्ये तापमान घसरू लागले असून त्याचा परिणाम मैदानी भागातही दिसून येत आहे. यामुळेच दक्षिण भारतात थंडीचा कडाका सुरु झाला. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पारा घसरला असून तापमान काही ठिकाणी 14 ते 22 अंश सेल्सियस असे आहे. यामुळे थंडीचा कडाका अजूनही वाढला आहे.

Weather Update Severe cold in Maharashtra

अहमदनगर, सोलापूरचा पारा घसरला, गुरुवारी 14.6 अंशाची नोंद

गेल्या आठ दिवसापासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील तपमानाचा पारा सातत्याने घसरत चाललाा आहे. त्यामुळे वातावरणात कमालीची थंडी सुटली आहे. सोलापूरकरांना थंडीची हुडहुडी भरली आहे. तर ग्रामीण भागात आता शेकोट्या पेटविण्याचे काम सुरु झाले आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापूवी तपमानाचा पारा किमान 25 अंशावर आला होता. तर गेल्या आठ दिवपासून यामध्ये कमालीची घट होत चालली आहे. सोमवारी 25 अंशावरुन थेट 17 अंशावर पारा उतरला हेाता. तर मंगळवारी बुधवारी तो 15 अंशावर आला होता. गुरुवारी त्यामध्ये पुन्हा घट झाली आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाही 14 अंशावर तपमान घसरले होते. त्यामुळे सोलापूरकरंाना तीव्र थंडीचा सामना करावा लागला. तर अलिकडचा काळात सर्दी खोकल्याच्या रुग्णामध्ये ही कमालीची वाढ होत चालली आहे.

Weather Update Severe cold in Maharashtra

(राज्यातील काही भागतील कालचे तापमान यादी : स्त्रोत - आयएमडी.)

तामिळनाडूत फेंगलचा कहर

दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, तामिळनाडू, कराईकल, पुडुचेरी, यानम आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

रायलसीमामध्येही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने हिमाचल प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात आज म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी धुक्याचा इशारा जारी केला आहे. पुढील दोन दिवस पंजाब आणि उत्तर प्रदेशात असेच वातावरण राहील.

हिवाळ्याच्या थंडीने दिल्ली-NCR प्रदेशात आपली पकड मजबूत करणे सुरू केले आहे, रहिवासी हवामानाच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय बदल पाहत आहेत. येत्या काही दिवसांत या भागात थंडी वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाचे (IMD) म्हणणे आहे. दिल्लीतील तापमान आधीच घसरले असून रात्री 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

आजपासून दिवसाचे तापमान घसरणार

थंडीचा हा काळ केवळ रात्रीपुरता मर्यादित नसून आजपासून दिवसाचे तापमानही घसरणार आहे, त्यामुळे थंडी आणखी वाढणार आहे. दिवसभर थंड वारे वाहत असल्याने पारा घसरलेला दिसत आहे. हे वारे केवळ तापमानावर परिणाम करत नाहीत तर दिल्लीच्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सुधारण्यातही योगदान देत आहेत. पूर्वी 500 चा उच्चांक गाठणारा AQI आता 383 वर पोहोचला आहे.

आज, नोएडा आणि गाझियाबादच्या आसपासच्या भागात हवामानाचा नमुना स्थिर आहे आणि कमाल आणि किमान तापमान दोन्ही स्थिर आहे. या जिल्ह्यांमध्ये हलके वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान आणखी थंड होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, गुरुग्राममध्ये आज कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस, दिल्लीच्या बरोबरीने राहण्याचा अंदाज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+