प्रियंका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज; म्हणाल्या-35 वर्ष कुटुंबासाठी लढले, आता माझ्यासाठी समर्थन द्या
Wayanad By-Election 2024 Priyanka Gandhi Filed Nomination Form :काँग्रेस नेत्या तथा सरचिटणीस प्रियंका गांधी वाडरा यांनी वायनाडमध्ये मोठा रोड शो केला.यानंतर त्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आपला उमेदवारी नामांकन आज भरले. यावेळी त्यांनी एक भावनिक वक्तव्य केले.पस्तीस वर्ष मी माझ्या आई, वडील आणि भावासाठी निवडणुकीत कॅम्पेन केले आता मी माझ्यासाठी तुमचे समर्थन मागत असल्याचे त्या म्हणाल्या.
रोड शोनंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत भाऊ राहुल गांधी, आई सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
प्रियांका गांधी म्हणाल्या- मी 17 वर्षांची असताना 1989 मध्ये पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला होता. तेव्हापासून या 35 वर्षात आई आणि भावासाठी जनतेला मते मागितली पण यंदा मी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी जिंकण्यासाठी मी स्वतःसाठी पहिल्यांदाच जनतेचे समर्थन मागत आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले की, वायनाड हा देशाचा एक प्रदेश आहे जिथून 2 खासदार आहेत. एक अधिकृत खासदार (जो निवडून येईल तो) आणि दुसरा अनधिकृत खासदार दोघेही वायनाडसाठी काम करतील.
प्रियंकांची पहिलीच निवडणूक
प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांनी निवडणूक लढवण्याचा श्रीगणेशा वायनाडमधून केला आहे. त्यांच्या विरोधात भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची पारंपारिक जागा निवडली आणि वायनाड सोडले. येथे 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
4 मुद्यांत समजून घ्या काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
1. वायनाडचे लोक मदतगार: भूस्खलनादरम्यान एक गोष्ट लक्षात आली. इथे डॉक्टर, शिक्षक, गृहिणी, सगळे एकमेकांना मदत करण्यात व्यस्त होते. ते एकमेकांना सहानुभूतीने, प्रेमाने, आपुलकीने आणि हिंमतीने कोणताही लोभ न ठेवता साथ देत होते. आपल्या कुटुंबाचा एक भाग असणे हा एक विशेषाधिकार आहे.
2. भूस्खलनात कुटुंबे गमावलेल्या लोकांची भेट: वायनाडमधील चुरमला आणि मुंडक्काई येथे भुसख्खलनानंतर मी माझ्या भावासोबत (राहूल गांधी) भेट दिली होती. मी माझ्या डोळ्यांनी विध्वंस पाहिला. मी अशी मुले पाहिली ज्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब गमावले. मी अशा मातांना भेटलो ज्यांनी आपली मुले गमावली, ज्यांचे संपूर्ण आयुष्य भूस्खलनात वाहून गेले.
3. सत्तेवर आलेल्यामध्ये द्वेषभावना : जे सत्तेत आहेत त्यांनी सत्तेत राहण्यासाठी द्वेषाचा वापर केला. त्यांनी तेढ निर्माण केली. हे आपले राष्ट्र ज्या राजकारणावर बांधले गेले ते नाही. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आपली स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक धर्माच्या समानतेने आणि आदराने प्रेरित होती.
4. सत्य आणि न्यायासाठी आमचा लढा: येशू ख्रिस्त आपल्याला नम्रतेबद्दल शिकवतात. बुद्धाची शिकवण आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखवते. आज आपण राष्ट्रवादाच्या या मूल्यांसाठी लढत आहोत. आम्ही सत्य, न्याय आणि समतेसाठी लढत आहोत. या मूल्यांनी माझ्या भावाला भारतभर प्रेम आणि एकात्मतेसाठी चालण्याची प्रेरणा दिली.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications