Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवऱ्याला डावलून पुतण्यासोबत गुलछरे, देशभरात व्हायरल झालेलं 'जमुई' प्रकरण नेमकं आहे तरी काय?

बिहारमधील जमुई जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने कौटुंबिक नातेसंबंधांची मर्यादा आणि सामाजिक मूल्यांची संकल्पना दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. इथे एक विवाहित महिलेनं आपल्या पतीच्याच पुतण्याशी लग्न केलं आहे, तेही अशा वेळी जेव्हा तिच्या पतीसोबतचा घटस्फोटाचा कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही.

Jamui viral news


24 वर्षीय आयुषी कुमारी, मूळची पटणाची रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिचं लग्न सिकेरिया गावातील विशाल कुमार दुबे याच्याशी झालं होतं. या दोघांना एक तीन वर्षांची मुलगी देखील आहे. पण दरम्यानच्या काळात आयुषीचे विशालच्याच पुतण्याशी सचिन दुबे याच्याशी प्रेमसंबंध सुरू झाले.

माहितीनुसार, आयुषी आणि सचिन यांच्यात गेल्या एक वर्षापासून जवळीक वाढत होती, जी हळूहळू प्रेमात बदलली. जेव्हा पती विशालला हे नातं समजलं, तेव्हा त्याने याला तीव्र विरोध केला. त्यानंतर घरात रोज भांडणं होऊ लागली आणि प्रकरण थेट पोलीस स्टेशन व कोर्टापर्यंत पोहोचलं. विशालने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आणि घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला.

पण या सर्व गोंधळात आयुषीने एक मोठा निर्णय घेतला. तिनं आपला प्रियकर सचिनसोबत घर सोडलं आणि पाच दिवसांनी गावात परत येऊन मंदिरात त्याच्यासोबत विवाह केला. मंदिरात सिंदूर आणि मंगळसूत्रासह ही लग्नसोहळा सार्वजनिकरीत्या मान्यताही देण्यात आली.

लग्नानंतर आयुषीने सांगितलं, "मी मानसिक आणि शारीरिक त्रासाने त्रस्त झाले होते. आता सचिनच माझं सर्व काही आहे. माझी मुलगी तिच्या वडिलांकडेच राहील."

तर सचिननेही उघडपणे सांगितलं, "माझं आयुषीवर खरोखर प्रेम आहे आणि आता आम्ही दोघं मिळून एकत्र आयुष्य घालवणार आहोत."

दुसरीकडे, पती विशालने नाराजीने प्रतिक्रिया दिली की, "आता मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. ती जिथे राहो, कशी राहो, मला काही फरक पडत नाही."

हे प्रकरण आता फक्त गावापुरतंच सीमित न राहता, सोशल मीडियावरही चर्चेचं प्रमुख विषय बनलं आहे. काही जण याला प्रेमाचा विजय मानत आहेत, तर काहीजण नात्यांच्या सीमारेषांवर झालेला आघात म्हणत हे प्रकरण टीकेच्या भोवऱ्यात आणत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+