Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! CP राधाकृष्णन् देशाचे नवे उपराष्ट्रपती! NDA चा मोठा विजय, इंडिया आघाडीचे रेड्डी पराभूत

Vice President Election Results : एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे भारताचे नवे उपराष्ट्रपती असतील. त्यांनी इंडिया ब्लॉकचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

देशाला सीपी राधाकृष्णन यांच्या रुपात १५ वे उपराष्ट्रपती लाभले आहेत. आज 9 सप्टेंबर 2025 उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडले. सकाळी दहावाजेपासून सुरु झालेली मतदार प्रक्रीया सायंकाळी पाच वाजता पुर्ण झाली. यानंतर मतमोजणी झाली असून त्यात एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला आहे. आता लवकरच उपराष्ट्रपती पदाची शपथ घेऊन सीपी राधाकृष्णन कार्यभार स्वीकारतील.

Vice President Election Results

कुणाला किती मते?

राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. मोदी म्हणाले, "एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली. त्यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली."

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर देशाच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज ९ सप्टेंबरला निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभेचे उमेदवार मतदान करतात. राज्यसभेचे 245 आणि लोकसभेचे 543 असे एकूण 788 खासदार या निवडणुकीत मतदाते होते.

आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरु झालेल्या मतदानाची प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षेनेते राहुल गांधी आणि जवळपास सर्व खासदारांनी सहभाग घेतला. मतमोजणीला सायंकाळी पाचनंतर सुरुवात झाली व नंतर मतमोजी प्रक्रीया रात्री पुर्ण झाली.

चुरशीची झाली लढत

उपराष्ट्रपती पदासाठी आजची निवडणूक सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी 'INDIA' आघाडी यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी मतदान केले. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात चुरशीची लढत झाली.

एवढ्या खासदारांनी बजावला मतदानाचा हक्क

संसद भवनातील रूम नंबर 101 मध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 788 खासदारांपैकी 7 जागा रिक्त आहेत, म्हणून सध्या 7181 असा एकूण खासदारांचा आकडा आहे, यातील 768 खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर 13 खासदारांनी मतदान केले नाही. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता मतमोजणी लवकरच सुरू होईल आणि थोड्याच वेळात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच पहिल्याच सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, जितेंद्र सिंह आणि एल मुरुगन यांच्यासोबत सर्वात आधी मतदान केले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संसद भवनात आपला मतदानाचा हक्क बजावला.

एनडीए वरचढ

संसद भवनात एकूण 781 खासदार आहेत (542 लोकसभा आणि 239 राज्यसभा) यामध्ये एनडीए आघाडीला 427 खासदारांचा पाठिंबा असून, विजयासाठी आवश्यक असलेल्या 391 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा हे संख्याबळ खूप जास्त आहे. तर, 'इंडिया' आघाडीकडे 315 खासदार आहेत. बीजू जनता दल (BJD) आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांसारख्या काही प्रमुख पक्षांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+