Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वंदे मातरम् गीताला 150 वर्षे पूर्ण, राष्ट्रीय गिताचा का आणि कधी मिळाला दर्जा, इतिहास काय? वाचा

Vande Mataram Turns 150 History Writer and National Song Status : भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा 'महामंत्र' आणि देशाचं राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्' या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या तेजस्वी काव्याचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यात त्याचं असलेलं स्थान आणि त्याला मिळालेला 'राष्ट्रीय गीताचा' दर्जा या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Vande Mataram Turns 150

गीताचा गौरवशाली इतिहास

'वंदे मातरम्' या गीताचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंकिमचंद्र चटर्जी) हे आहेत. त्यांनी हे गीत १८७० च्या दशकात लिहिले.

पहिले प्रकाशन: हे गीत सर्वप्रथम ७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकिमचंद्र यांच्या 'बंगदर्शन' या साहित्यिक मासिकात प्रकाशित झाले.

कादंबरीतील समावेश: नंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या गाजलेल्या 'आनंदमठ' या कादंबरीत या गीताचा समावेश केला.

पहिले जाहीर गायन: 'वंदे मातरम्' हे गीत पहिल्यांदा १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी गायले होते.

स्वातंत्र्यलढ्यात 'वंदे मातरम्'चं योगदान

'वंदे मातरम्' हे गीत केवळ शब्द नव्हते, तर ते मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची आणि देशभक्तीची भावना जागृत करणारे एक शस्त्र बनले.

युद्धघोष: विशेषतः १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणी विरोधातील 'स्वदेशी' आंदोलनात हे गीत क्रांतीकारक आणि सामान्य जनतेचा युद्धघोष बनले. देशभरात "वंदे मातरम्" च्या जयघोषाने ब्रिटीश सत्तेला हादरे दिले.

अमर संदेश: अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हाच शब्द मुखात ठेवला, ज्यामुळे या गीताला अमरत्व प्राप्त झाले.

राष्ट्रीय गीताचा दर्जा कधी आणि कशामुळे मिळाला?

२४ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत 'वंदे मातरम्' या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला.

कशामुळे मिळाला राष्ट्रीय गीताचा दर्जा

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लाखो भारतीयांना प्रेरित करण्यात या गीताचा अमूल्य वाटा होता. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी निवेदन करताना स्पष्ट केले की, 'वंदे मातरम्'ने स्वातंत्र्यलढ्यात बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे, त्याला राष्ट्रगान 'जन गण मन' प्रमाणेच समान दर्जा आणि सन्मान दिला जाईल. हे गीत आजही देशाप्रती अभिमान, प्रेम आणि समर्पण याची भावना कायम ठेवते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+