Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केंद्रीय मंत्र्याच्या भाच्याची गोळी झाडून हत्या! काय आहे प्रकरण, कोण आहेत मंत्री नित्यानंद राय? वाचा

Union Minister's nephew shot dead : बिहारमध्ये रक्तपात घडला असून केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या भाचाचाच खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन भावांच्या वादात एका भावाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला तर त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. यातील दुसरा भाऊ हाही जखमी झाला आहे.

मृत व्यक्ती बिहारमधील नवगचिया येथील असून ती केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांचा भाषा आहे. नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत भाचा आणि बहीणही जखमी झाले आहेत. परस्पर वादातून नित्यानंद राय यांचे दोन भाचे जयजित यादव आणि विकास यादव यांच्यात गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.

Union Minister s nephew shot dead

या गोळीबारात विकास यादवचा जागीच मृत्यू झाला. जयजित यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. याच गोळीबारात नित्यानंद राय यांच्या बहिणीलाही गोळी लागली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांमध्ये गोळीबार का झाला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नित्यानंद राय यांच्या दोन भाच्यांमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार झाला होता. जयजित यादव यांच्या पत्नीने सांगितले की, दोन भावांमध्ये गेल्या एक वर्षापासून जमिनीवरून वाद सुरू होता. त्यामुळे हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्यातून दोघे आमने सामने आले व त्यांच्यात झडप झाली. यात गोळी झाडली गेल्याने विकास यादव यांचा मृत्यू झाला आहे.

जयजित यादव यांची प्रकृती चिंताजनक

प्राप्त माहितीनुसार, जयजित यादव यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. नवगचियाचे पोलिस अधिक्षक प्रेरणा कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन भावांमध्ये नळावरून वाद झाला होता. यानंतर दोन्ही भावांमध्ये सुमारे 3 राउंड फायरिंग झाल्या. मृताला एक गोळी लागली असून जयजीतला दोन गोळ्या लागल्या आहेत.

कोण आहेत नित्यानंद राय?

  • नित्यानंद राय हे एनडीए सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत.
  • बिहारमधील उजियारपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी 2024 मध्ये निवडणूक लढवली आणि सुमारे साठ हजार मतांनी आलोक मेहता यांचा पराभव त्यांनी केला आहे. त्यांचा जन्म हाजीपूर येथे 1 जानेवारी 1966 रोजी यादव कुटुंबात झाला आहे.
  • भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हाप्रमुख व विभागप्रमुख पद राय यांनी सुरुवातीच्या काळात भुषवले होते.
  • आरएसएस शाखेत स्वयंसेवक म्हणून त्यांनी तहसील केअरटेकरची जबाबदारीही स्वीकारली.
  • नित्यानंद राय यांनी 1990 मध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला आणि पंचायत स्तरावरून काम करण्यास सुरुवात केली.
  • बिहार राज्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे मंत्री आणि प्रदेश सरचिटणीस या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी 1998 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
  • 2000 मध्ये ते हाजीपूर विधानसभा मतदारसंघातून बिहार विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी राज्य सचिव, सरचिटणीस आणि बिहार भाजप युनिटचे अध्यक्षपद भूषवले.
  • 30 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांची बिहार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नामांकन करण्यात आले. बिहार भारतीय जनता पार्टी युनिटचे अध्यक्ष असताना त्यांनी गाव आणि बूथ स्तरावर पक्ष मजबूत केला.
  • नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणूक-2019 मध्ये 40 पैकी 39 जागांवर अभूतपूर्व विजय मिळवला. राय यांनी दुसऱ्यांदा खासदारकीची जागा 3.75 लाखांहून अधिक मतांनी जिंकली.
  • राय यांनी गेल्या वर्षी अर्थात 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत उजीयारपूर मतदारसंघातून विजय मिळवत हॅट्रीक नोंदवली आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+