Skill India Missionने भारतातील युवकांना काय दिलंय, का केवळ दिखावाच होता, रोजगारसंधी किती?
Skill India Mission : स्कील इंडिया मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची सर्वात मोठी योजना. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील युवकांना रोजगाराच्या साठी कौशल्य विकसीत करण्याचे उद्देश होते. तर त्या स्कीलच्या प्राप्तीतून युवकांनी स्वत:च रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, अशी त्यामागची संकल्पना होती. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले का हा चिंतेचा विषय आहे.
भारतात स्कील इंडिया मिशनला आज दहा वर्षे पूर्ण झालीत, त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्र्यांच्या वतीने तसेच भारत सरकारने या योजनेतून काय साध्य केले, का केवळ ही योनजा एक दिखावाच म्हणून राहिली, यावर एक नजर टाकूया.
सरकारने केलाय हा दावा!
कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना होऊन आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील दहा वर्षांमध्ये सुमारे ६ कोटी तरुण-तरुणींना या माध्यमातून रोजगाराचे धडे देण्यात आले. विशेष बाब म्हणजे, तरुण-तरुणींनी या प्रशिक्षणामध्ये एआय, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्सला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. बदलत्या काळानुसार स्कील आत्मसात करण्याची आवड तरुणांमध्ये निर्माण झाल्याचे यातून स्पष्ट होते.

किती युवकांना मिळाले प्रशिक्षण अन् रोजगाराच्या संधी!
गेल्या दहा वर्षांत, मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीची मागणी आहे. त्यानुसार, 'स्किल इंडिया मिशन'मध्ये सहा कोटींहून अधिक तरुणांनी रोजगार प्रशिक्षण घेतले आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत (PMKVY) १.६४ कोटी तरुणांनी उत्पादन, बांधकाम, आरोग्यसेवा, आयटी, रिटेल, इलेक्ट्रॉनिक्स यासह ३८ क्षेत्रांमध्ये नवीन युगातील कौशल्यांमध्ये प्राविण्यता मिळवली आहे, ज्यामध्ये ४५% महिला आहेत.
यापैकी ३४% ओबीसी, १३% एससी आणि ५% एसटी श्रेणीतील मुली आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि मेकॅट्रॉनिक्स ही महिलांमध्ये सर्वाधिक पसंतीची क्षेत्रे होती.
हे ही वाचा : पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा हे आहे फायदे! पात्रता, अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे हवी जाणून घ्या
उपेक्षित समुदायांना जीवनदान मिळाले
जन शिक्षण संस्थानमुळे उपेक्षित समुदायातील लोकांना नवे जीवनदान मिळाले आहे. या समुदाय-आधारित कौशल्य केंद्रांनी ग्रामीण, आदिवासी आणि उपेक्षित लोकसंख्या, विशेषतः महिला, अनुसूचित जाती (एसटी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि अल्पसंख्याकांच्या दाराशी व्यावसायिक प्रशिक्षण आणले आहे.
गावागावात उभारले जात आहेत छोटे उद्योग!
२०१८ ते २०२५ या काळात, ३१,२६,६८३ लोकांना शिवणकाम, भरतकाम, हस्तकला, अन्न प्रक्रिया आणि आरोग्य सेवा समर्थन यासारख्या व्यवसायांमध्ये प्रशिक्षण मिळाले आणि तळागाळात उपजीविकेच्या संधी वाढल्या. गावागावात लोक उद्योग उभारू लागले. स्मॉल उद्योगाला देखील चालना मिळाली.
पीएम स्किल स्किमचे फायदे काय
१. मोफत कौशल्य प्रशिक्षण
२. ही योजना विविध उद्योगांमध्ये रोजगार मिळण्याची शक्यता वाढवते, ज्यामुळे रोजगारक्षमता वाढते.
३. PMKVY प्रमाणपत्र सर्व उद्योगांमध्ये ओळखले जाते, ज्यामुळे व्यक्ती त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात करिअर करू शकतात.












Click it and Unblock the Notifications