Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची पुण्यतिथी; या संदेशाद्वारे करा त्यांचे स्मरण, वाचा प्रेरक विचार

Sarvepalli Radhakrishnan Death Anniversary punyatithi 2025 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाच्या शैक्षणिक आणि राजकीय इतिहासातील सोनेरी नाव...त्यांनी शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अफाट यश मिळवले. शिक्षक म्हणून सुरुवात करणारे डाॅ. राधाकृष्णन यांची शिक्षकी पेशा सांभाळनंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. 13 मे 1952 ते 12 मे 1962 पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने 1954 साली त्यांना 'भारतरत्न' हा किताब देऊन त्यांना गौरविले.

देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन डाॅ. राधाकृष्णन यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू 17 एप्रिल 1975 रोजी झाला. आज 17 एप्रिल 2025 रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांचे विचार आजही जगाला आणि देशाला दिशादर्शक आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी जाणून घेऊया, तसेच त्यांचे अनमोल विचारही समजून घेऊया.

Sarvepalli Radhakrishnan Death Anniversary punyatithi 2025

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला. मद्रास ख्रिचन कॉलेज मधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेऊन त्याच कॉलेज मधून पदवीत्तर शिक्षण घेतले. भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी 1962 ते 1967 पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि 1952 ते 1962 पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. ते 1949 ते 1952 पर्यंत सोव्हिएत युनियनमधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. तसेच 1939 ते 1948 पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते.

राधाकृष्णन यांचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदांतावर आधारित होते. त्यांनी या परंपरेची समकालीन आकलनासाठी पुनर्व्याख्या केली. ज्याला ते "अज्ञात पाश्चात्य टीका" म्हणायचे, त्याच्यापासून त्यांनी हिंदू धर्माचा बचाव केला. समकालीन हिंदू ओळख निर्माण करण्यात राधाकृष्णन यांनी योगदान दिले. भारत आणि पश्चिम जग अशा दोन्ही देशांमध्ये हिंदू धर्माची समज निर्माण करण्यात त्यांचा मोठा प्रभाव होता. भारत आणि पश्चिम जग यांच्यामध्ये पूल बांधणारी व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

Sarvepalli Radhakrishnan Death Anniversary punyatithi 2025

राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1931 मध्ये नाइटहूड, 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न आणि1963 मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल केले गेले.

डाॅ. राधाकृष्णन यांचे विचार जे तुमच्या आयुष्यात बदल घडवतील

  • खरा शिक्षक तोच जो आपल्याला आपल्याबद्दल विचार करायला शिकवतो - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • पुस्तक असे माध्यम आहे ज्यांच्यामार्फत अनेक संस्कृतीमध्ये पूल बांधण्याचे काम होते. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • "माणूस राक्षस झाला तर तो त्याचा पराभव आहे, माणूस जर महापुरुष झाला तर तो त्याचा चमत्कार आहे, पण माणूस माणूस झाला तर तो त्याचा विजय आहे" - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • ज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावरच सुखी जीवन शक्य आहे. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • पुस्तके वाचल्याने एकांतात विचार करण्याची सवय लागते आणि खरा आनंद मिळतो. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • खरे शिक्षक तेच असतात जे आपल्याला स्वतःचा विचार करायला मदत करतात. -डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • जीवनातील सर्वात मोठी देणगी म्हणजे उच्च जीवनाचे स्वप्न -डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • देव पापमुक्त आहे, वृद्धापकाळापासून मुक्त आहे, मृत्यू आणि दुःखापासून मुक्त आहे, भूक आणि तहानपासून मुक्त आहे, ज्याला कशाचीही इच्छा नाही आणि कशाचीही कल्पना नाही. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • संपत्ती, शक्ती आणि कार्यक्षमता हे केवळ जीवनाचे साधन आहे, जीवन नाही. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • जीवनाकडे वाईट आणि जगाकडे भ्रम म्हणून पाहणे म्हणजे निव्वळ कृतघ्नता होय. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

    Sarvepalli Radhakrishnan Death Anniversary punyatithi 2025

  • डाॅ. राधाकृष्णन अभिवादन - विचार संदेश, व्हाॅट्सअॅप- इन्स्टाग्राम स्टेटस

  • काही महापुरुषांना आपण कधीच भेटलेलो नसलो तरीही ते जेव्हा जग सोडून जातात, तेव्हा डोळ्यात पाणी येते. कारण ते राष्ट्रासाठी समर्पित असतात आणि आपल्याला जीवनाचा मंत्र देऊन जातात.. - डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन
  • जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला..डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन
  • डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन या जगात नसले तरीही त्यांचे विचार कायम आपल्यासोबत आहेत. - डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन
  • देशाचे शिक्षक आणि देशाचे नाव जगात उंचावणारे डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन कायम आपल्या हृदयात आहेत - डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+