रमजान महिन्याची सुरुवात कधी होणार?, पहिला उपवास 1 की 2 मार्चला, जाणून घ्या सर्व काही
Ramadan 2025 First Roza Date : पवित्र रमजान महिन्याची सुरुवात अगदी तोंडावर आलेली आहे. तथापि, उपवासाची वेळ चंद्रदर्शनानंतरच ठरवली जात असते. यावर्षीचा रमजान महिना नेमका कधी सुरू होणार, रोजा (उपवास) कधीपासून सुरू होणार याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तरपणे.
मुळात इस्लामिक कॅलेंडरनुसार जर विचार केला तर रमजान महिना हा वर्षाचा नववा महिला मानला जातो. या महिन्यात लोक उपवास ठेवतात आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र मोठ्या थाटामाटात साजरी करतात. या वर्षी रमजान महिना कधी सुरू होत आहे, याबाबत अनेकांना संभ्रम निर्माण झालेला आहे. मार्च महिन्याच्या एक तारखेला सुरुवात होणार की दोन तारखेपासून उपवास करायचे, याबाबत मुस्लिम बांधवांमध्ये संभ्रमावस्था आहे..

रमजान कधी सुरू होईल?
या वर्षी, रमजान 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्च रोजी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यासंदर्भातील तारीख अद्यापही स्पष्ट झालेली नाही. कारण ती चंद्र दिसण्यावर अवलंबून आहे. रमजान महिना अमावस्या दिसू लागल्यावर सुरू होतो. या परिस्थितीत, जर 28 फेब्रुवारी रोजी रमजानचा चंद्र दिसला तर पहिला उपवास 1 मार्च रोजी पाळला जाईल. दुसरीकडे, जर 1 मार्च रोजी चंद्र दिसला तर पहिला उपवास 2 मार्च रोजी पाळला जाईल.
हे ही वाचा : Ramadan 2025 Wishes in Marathi : पवित्र रमजान महिन्याच्या तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास शुभेच्छा!
रमजान महिन्याचे वैशिष्ट्ये काय?
रमजान महिन्यात मुस्लिम समुदायाचे लोक उपवास ठेवतात आणि देवाची पूजा करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास असतो. या काळात सेहरीच्या वेळी सूर्योदयापूर्वी काही अन्न खाल्ले जाते. दिवसभर कोणत्याही प्रकारचे अन्न किंवा पाणी सुद्धा पिले जात नाही. सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो, ज्याला इफ्तारी म्हणतात. रमजानमध्ये नमाज अदा करण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मुस्लिमाने दिवसातून पाच वेळा नमाज अदा करणे अनिवार्य आहे आणि रमजानमध्ये ते विशेषतः महत्वाचे मानले जाते. इस्लाममध्येही दानधर्माला मोठे स्थान आहे आणि रमजानमध्ये नमाजानंतर जकात अत्यंत महत्त्वाची मानली जाते, त्याचे विशेष असे योगदान आहे.
हे ही वाचा : Ramadan Dates 2025 : रमजान कधी आहे? भारतातील शहरनिहाय सेहरी आणि इफ्तारच्या वेळा कधी?
रमजानमधील शेवटच्या दहा दिवसाला खूप महत्त्व?
काही मौलानांच्या मते, रमजानचा सर्वात खास काळ म्हणजे त्याच्या शेवटच्या दहा रात्री, ज्यामध्ये लैलातुल कद्र (शबे कद्र) येते. ही रात्र हजार महिन्यांपेक्षा जास्त आशीर्वादांनी भरलेली असल्याचे म्हटले जाते. शेवटी, रमजान ईद-उल-फित्रने संपतो, जो अल्लाहचे आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. एकंदरीत, रमजान हा केवळ उपासनेचा महिना नाही तर तो माणसाला चांगल्या मनाचा आणि चांगला माणूस बनवण्याचा महिना आहे..












Click it and Unblock the Notifications