तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता पण तुम्हाला हिंदू धर्म कळत नाही- संसदेत राहूल गांधी भाजप सरकारवर बरसले
नवी दिल्ली - तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता पण तुम्हाला हिंदू धर्म कळत नाही, भाजपचा चक्रव्यूव्ह सहा लोक चालवत असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सहा लोक असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलं. ते आज लोकसभेत बोलत होते.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भाजपच्या चक्रव्यूहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्योजक मुकेश अंबानी चक्रव्यूव्ह चालवत असल्याचं म्हटलं आहे. हे सांगताना ते भाजपवर तुटून पडले त्यांनी जोरदार शाब्दिक हल्लाही चढवला.

मी कधीच हिंदू धर्माचा अवमान करु शकत नाही
राहूल गांधी म्हणाले, सत्ताधारी टीका करतात की,राहूल गांधी हिंदू धर्माचा अपमान करतात त्यावर राहूल गांधी म्हणाले, मी हिंदू धर्माचा अवमान केला नाही. मी कधीही अवमान करुच शकत नाही. पण दुखः या गोष्टीचं वाटतं की, जो टेबल बनवतो तो टेबल शोरुममध्ये ठेवला जातो पण टेबल बनवणाऱ्यांना त्या शोरुममध्ये जाऊ दिलं जात नाही. अर्थात ते भेदभाव या विषयावर बोलत होते.
जातनिहाय जनगणना करा
भाजपचे चक्रव्युव्ह जे सहा लोक चालवतात ते चक्रव्यूव्ह आम्ही तोडणार आहोत. जातीनिहाय जनगणना करा अशी मागणीही संसदेत राहूल गांधी यांनी केली. या सदनात आम्ही जातनिहाय जनगणनेचे बिल पास करण्यात यशस्वी होऊ असेही राहूल गांधी म्हणाले. तसेच या जातनिहाय जनगणनेमुळे चक्रव्यूव्ह तुटेल असेही ते म्हणाले. आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ.
बजेटचा हलवा..
सभागृहात बजेट हलवा समारंभाचा फोटो दाखवत राहुल म्हणाले - या फोटोमध्ये हा बजेटचा हलवा वाटला जात आहे. यामध्ये एकही मागासलेला दलित किंवा आदिवासी अधिकारी दिसत नाही. 20 अधिकाऱ्यांनी बजेट तयार केले आहे. म्हणजे 20 लोकांनी भारताचा हलवा वाटला. वाटते कोण- तेच दोन-तीन टक्के लोक? फक्त हेच तीन टक्के. उरलेल्या 99 टक्के लोकांना काय मिळणार?
केंद्र सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत खंजीर खुपसला
राहूल गांधी म्हणाले, अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधानांनी जनतेवर दबाव आणला तो मध्यमवर्ग. आम्हाला विचित्र वाटले, पण पंतप्रधानांनी आदेश दिल्यावर आम्ही थाळी वाजवली. फोनची लाईट चालू करा म्हणाला आणि लाईट लावली. या अर्थसंकल्पात तुम्ही याच मध्यमवर्गीयांच्या पाठीत एक आणि छातीत एक वार दिला.
इंडिया आघाडीचा फायदा असा आहे की मध्यमवर्ग तुम्हाला सोडून आमच्याकडे येत आहे. तुम्ही चक्रव्यूह निर्माण करण्याचे काम करा, आम्ही ते मोडण्याचे काम करत आहोत. तुम्हाला असे वाटते की गरीब लोक स्वप्न पाहू शकत नाहीत? असा सवालही राहूल गांधी यांनी केला.












Click it and Unblock the Notifications