Rahul Gandhi : भाजप फक्त खोटे बोलतेय!, राहुल गांधींचा जम्मू आणि काश्मीरमध्ये PM मोदींवर हल्लाबोल
Rahul Gandhi : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पूंछमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान लोकसभा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार आरोप केले. भाजप आणि आरएसएस देशात फुट पाडत असून देशात ते हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला आहे.
भाजप आणि आरएसएसच्या कृतींमुळे शत्रुत्व आणि हिंसेला चालना मिळाली आहे, यामुळे देशाची एकता आणि शांतता बिघडली आहे. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले की, जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा मिळावा अशी आमची इच्छा आहे. काश्मीरी जनतेला संबोधन करताना ते म्हणालेस आम्ही तुमच्या राज्याचा दर्जा परत देण्यासाठी आधी भाजपवर दबाव आणू, जर त्यांनी तुम्हाला ते दिले नाही तर आम्ही तुम्हाला राज्याचा दर्जा परत देऊ. तो तुमचा अधिकार आहे, तुमचा लोकशाही अधिकार आहे आणि तो तुम्हाला द्यायचा आहे.

राहुल गांधी म्हणाले की, भाजप-आरएसएस जम्मू-काश्मीर आणि इतर राज्यांमध्ये द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत. त्यांना फक्तद्वेष कसा पसरवायचा हे माहीत आहे आणि त्यांचे राजकारणही द्वेषाचे आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पूंछ येथे पोहोचलेले राहुल गांधी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये एक राजा आणून बसवला आहे. ते म्हणजे उपराज्यपाल.. ते बाहेरचे आहेत, जम्मू-काश्मीरचे नाहीत. जम्मू-काश्मीरच्या जनतेला हवा असलेला विकास हे साध्य करु शकणारी व्यक्ती नाही, अशी उपराज्यपालांसंबधीत टीका त्यांनी केली .
राहुल गांधी म्हणाले की भारताचे विभाजन केंद्रशासित प्रदेशात झाले, छत्तीसगडचे विभाजन बिहारमध्ये झाले आणि आंध्र प्रदेशचे तेलंगणात विभाजन झाले. पण, भारताच्या इतिहासात आजवर कोणत्याही राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवले गेले नाही. पहिल्यांदाच राज्यातील जनतेचे हक्क हिरावून घेण्यात आले आहेत. तुमच्यावर अन्याय झाला आहे, तुम्हाला लवकरात लवकर राज्याचा दर्जा मिळावा, अशी माझी इच्छा आहे
'मन की बात' म्हटल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेरोजगारी, महागाई कमी होण्यासाठी मोठे भाषणं देत नाहीत जम्मू-काश्मीरसाठी या अशा गोष्टी आहेत ज्या नरेंद्र मोदी करणार नाहीत असेही ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications