'ईडीच्या छाप्याची योजना आखली जात आहे', तपास यंत्रणेचे खुलेआम स्वागत करणार- राहूल गांधी
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान मी ज्या पद्धतीने चक्रव्यूह भाषण केले, त्यावरून ईडी माझ्यावर छापे टाकण्याच्या तयारीत आहे असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेचे खुलेआम स्वागत करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी म्हटलं आहे की, ईडीच्या एका आतल्या व्यक्तीने त्यांना सांगितले की एजन्सी त्यांच्या विरोधात छापे टाकण्याची तयारी करत आहे.

दौघांपैकी एक जणाला माझे भाषण आवडले नाही
राहुल गांधींनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत लिहिले दोघांपैकी एक जणाला माझे चक्रव्यूह भाषण आवडले नाही. छापे मारण्याची योजना आखली जात असल्याचे ईडीचे अंतर्गत अधिकारी मला सांगत आहेत. ईडीचे खुलेआम स्वागत करण्यासाठी मी त्याची वाट पाहत आहे. माझ्याकडून त्यांना चहा आणि बिस्किट, असं राहूल गांधी यांनी आपल्या एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे.
Apparently, 2 in 1 didn’t like my Chakravyuh speech. ED ‘insiders’ tell me a raid is being planned.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 1, 2024
Waiting with open arms @dir_ed…..Chai and biscuits on me.
राहुल यांनी चक्रव्यूहचा उल्लेख केला होता
आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपावर हल्ला करण्यासाठी महाभारतातील चक्रव्यूहाचे उदाहरण दिले होते. 21 व्या शतकात आणखी एक चक्रव्यूह तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
हे चक्रव्यूह कमळाच्या आकारात असून पंतप्रधान ते छातीवर धारण करतात. जे अभिमन्यूचे केले गेले तेच भारतातील तरुण, महिला, शेतकरी आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सहा जण या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांनी आणखी चार नावे सांगितली. पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाषणाचा हा भाग नाकारला कारण हे नेते सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांची नावे घेता आली नाहीत.
काही राजकीय अधिकारी आणि केंद्रीय एजन्सींनी देशाच्या संपूर्ण संपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची मक्तेदारी दोन लोकांकडे दिली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तुम्ही बेरोजगारी आणि पेपरफुटीचे चक्रव्यूह निर्माण केले. तुम्ही स्वतःला राष्ट्रवादी म्हणता पण जेव्हा तुम्हाला सैनिकांना मदत करावी लागते तेव्हा तुम्ही त्यांच्या पेन्शनचे पैसे देत नाही. अग्निवीरच्या 'चक्रव्यूह'मध्ये तुम्ही तरुणांना अडकवले.
या 6 जणांची नावे घेतली
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या दाव्यांचा पुनरुच्चार केला आणि म्हटले की, आज 21 व्या शतकातील कमळाच्या आकाराचा चक्रव्यूह भारताला अडकवत आहे. यामध्ये सहा व्यक्तींचे नियंत्रण आहे. ज्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, अदानी, अंबानी, अजित डोवाल आणि मोहन भागवत यांच्या नावाचा समावेश असलेल्या सहा व्यक्तींचे नियंत्रण आहे. .












Click it and Unblock the Notifications