भक्कम बजेट घेऊन देशासमोर येऊ, त्यात मोदी गॅरंटी दिसेल - पंतप्रधानांची भारतीयांना हमी
'विकसित भारताचे लक्ष्य 2047 पर्यंत गाठले जाईल, भक्कम बजेट घेऊन उद्या देशासमोर येऊ, मोदींची गॅरंटी त्यात दिसेल असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या संकुलातून देशवासीयांना संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदी म्हणाले, "सरकारची हमी लोकांपर्यंत पोहचवणे हे आमचे लक्ष्य आहे." आमच्या पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळाची ही दिशा असल्याचेही त्यांनी सांगितले.

विकसित भारताची हमी
पीएम मोदी म्हणाले, भारताच्या लोकशाहीच्या गौरवशाली प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मी पाहतो. व्यक्तिशः माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की 60 वर्षांनंतर एखादे सरकार तिसऱ्यांदा पुन्हा आले आणि तिसऱ्या टर्ममधील पहिल्या बजेटचे भाग्य लाभले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says "...It is a matter of pride that after 60 years, a government has come to power for the third time and will present the first Budget for the third time...I have been giving guarantees to the people of the country and our mission is to… pic.twitter.com/zw0URmCDdl
— ANI (@ANI) July 22, 2024
भारतासाठी ही अत्यंत अभिमानास्पद घटना म्हणून देश पाहत आहे. मी देशवासियांना जी हमी देत आलो आहे, त्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आम्ही पुढे जात आहोत. हा अर्थसंकल्प अमृतकालचा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. आम्हाला पाच वर्षे मिळालेली संधी आमच्या पाच वर्षांची दिशा ठरवेल. 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल.
हा विकासातील महत्वाचा टप्प्या
पीएम मोदी म्हणाले, भारत हा एक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने ८ टक्के वाढीसह आम्ही पुढे जात आहोत. आज भारतातील सकारात्मक दृष्टीकोन, गुंतवणूक आणि कामगिरी शिखरावर आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
नकारात्मक राजकारणाने वेळ वाया
पीएम मोदी म्हणाले, आज मला मोठ्या दु:खाने सांगावे लागत आहे की, काही खासदार 5 वर्षे आले. काहींना 10 वर्षांची संधी मिळाली. अनेकांना त्यांच्या क्षेत्राबद्दल बोलण्याची संधी मिळाली नाही. कारण काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणाने आपले अपयश झाकण्यासाठी देशाच्या संसदेच्या महत्त्वाच्या वेळेचा गैरवापर केला.
NEET परीक्षेवरून संसदेत गदारोळ
नीट परीक्षेबाबत संसदेत प्रचंड गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान नीटवर विरोधी खासदारांना उत्तर देत होते. दरम्यान, त्यांच्या या उत्तरावरून अनेकवेळा गदारोळ झाला. राहुल गांधी, अखिलेश यादव यांनी नीटवर प्रश्न उपस्थित केले.
आज आर्थिक सर्वेक्षण मांडणार
अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याआधी आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत.
(ही बातमी अपडेट होत आहे.)












Click it and Unblock the Notifications