Vinesh Phogat: अन्न पुरवणारे शेतकरी 200 दिवस रस्त्यावर, याचं वाईट वाटतं! विनेश फोगाट शेतकरी आंदोलनात
vinesh phogat : जे अन्न पुरवतात ते शेतकरी 200 दिवसांपासून रस्त्यावर बसले आहेत, हे पाहून मला वाईट वाटतंय. असं वक्तव्य ऑलिम्पियन कुस्तीटू विनेश फोगाट हिनं केलं आहे.
विनेश फोगाट आज दिल्लीनजीक शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनात सहभागी झाली आहे. तिनं यावेळी आंदोलनकर्त्यांना पाठबळ देत सरकारला विनंतीही केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 200 दिवस पूर्ण
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला 200 दिवस पूर्ण झाले आहेत. अनेक दिवसांपासून शंभू सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. अशा परिस्थितीत ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी शंभू सीमेवर पोहोचली आहे.
विनेशचे शेतकऱ्यांकडून स्वागत
जिथे शेतकरी नेत्यांनी त्यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. 13 फेब्रुवारीपासून दिल्लीकडे मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना शंभू सीमेवर पोलिस-प्रशासनाने रोखले होते, त्यानंतर शेतकरी शंभू सीमेवरच अडकून पडले आहेत. आंदोलक इतर प्रमुख मुद्द्यांसह सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ची कायदेशीर हमी देण्याची मागणी करत आहेत.
मला दुःख होतयं. - विनेश फोगट
दरम्यान, शनिवारी (31 ऑगस्ट) शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोहोचलेली Vinesh Phogat विनेश फोगट म्हणाली, "200 दिवस झाले आहेत शेतकरी आंदोलन करत आहेत. ते या ठिकाणी इतक्या दिवसांपासून बसले आहेत याचं दुःख होतंय. हे सर्व या देशाचे नागरिक आहेत, त्यांनी जर शेती पिकवली नाही आणि अन्न मिळालं नाही तर आम्ही स्पर्धेत टिकू शकणार नाही.
सरकारने शेतकऱ्यांचं दुःख ऐकावं
विनेश पुढे हेही म्हणाली की, "अनेक वेळा आपण असहाय आहोत आणि काहीही करू शकत नाही, आपण देशाचे इतक्या मोठ्या स्तरावर प्रतिनिधित्व करतो, परंतु आपण आपल्या कुटुंबासाठी काहीही करू शकत नाही, त्यांना आपण दुःखी पाहतो.मी सरकारला विनंती करते की, त्यांच्या मागण्या ऐकुन घ्यायला हव्या. सरकारने मागच्यावेळी आपल्या चुका मान्य केल्या होत्या, आता त्यांनी दिलेली वचनं पाळायला हवीत, जर लोक असेच रस्त्यावर बसले तर देश पुढे जाणार नाही. Vinesh Phogat












Click it and Unblock the Notifications