मुंबई ते मंगळुरू 12 तासांत पोहचणार! गोव्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार होण्याची शक्यता
Mumbai-Mangaluru journey : मुंबई: भारतीय रेल्वे मुंबई आणि मंगळुरूला थेट जोडणारी नवी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची शक्यता आहे. यामध्ये सध्याचा मुंबई-गोवा आणि मंगळुरू-गोवा वंदे भारत असा रुट करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यामुळे प्रवासाचा वेळ अंदाजे 12 तासांपर्यंत कमी होईल अशी शक्यता आहे.
फ्रि प्रेस जर्नलने यासंबंधी वृत्त दिले आहे, त्यानुसार मंगळुरू-गोवा मार्गावरील कमी पर्यायी रहदारीच्या समस्यांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो त्यामुळे दोन्ही शहरादरम्यान कनेक्टीव्हीटी वाढू शकणार आहे.

मुंबई ते गोवा ते मंगळुरू
आताच्या घडीला मुंबई-गोवा वंदे भारत मुंबईहून सकाळी 5:25 वाजता सुटते आणि दुपारी 1:10 वाजता गोव्यात पोहोचते. नवीन प्लॅननुसार ही ट्रेन पुढे मंगळुरूला वाढवण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे ही गाडी साधारण 6 वाजता पोहोचेल.
मंगळुरू गोवा ते मुंबई
परतीच्या प्रवासावेळी मंगळुरू-गोवा वंदे भारत, जी सध्या सकाळी 8:30 वाजता सुटते आणि गोव्यात दुपारी 1:10 वाजता पोहोचते, ती मुंबईपर्यंत 9:00 वाजता पोहोचेल, असे मनीकंट्रोलने आपल्या वृत्तात स्पष्ट केले आहे. यामुळे गोवा- मंगळुरूसोबतच मुंबई मंगळुरूचीही कनेक्टीव्हीटी वाढणार आहे. ती वाढावी हाच प्रयत्न आहे.
काय आहेत विस्तार वाढवण्यास अडचणी
मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर संध्याकाळच्या गर्दीमुळे विस्तारित सेवेचे वेळापत्रक तयार करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असे अहवाल सांगतात. याचे कारण म्हणजे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या एकाच वेळी येतात, ज्यामुळे प्लॅटफॉर्मची उपलब्धता मर्यादित होते. सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना या समस्येचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
विस्तार वाढवण्यामुळे काय होईल
मुंबई - मंगळुरू असा वंदे भारतचा विस्तार करण्यामागे काही जमेच्या बाजू आहेत. यामध्ये या मार्गाच्या विस्ताराचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे मंगळुरू-गोवा वंदे भारतचा कमी व्यापय अहवाल सूचित करतात की तिची प्रवासी व्याप्ती 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, ज्यामुळे ती सर्वात कमी वापरल्या जाणाऱ्या वंदे भारत सेवांपैकी एक आहे.
दुसरीकडे, मुंबई-गोवा वंदे भारतमध्ये सुरुवातीला 90 टक्के इतका उच्च व्याप्ती दर दिसला होता, परंतु नंतर तो सुमारे 70 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की सेवेचा विस्तार मंगळुरूपर्यंत केल्याने मागणी पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल.












Click it and Unblock the Notifications