बिग न्यूज! मुंबई- हावडा एक्स्प्रेसच्या अपघाताचं हे कारण आलं समोर
जमशेदपूर - झारखंडमधील जमशेदपूर येथे मंगळवारी पहाटे 3.43 वाजता मुंबई-हावडा एक्स्प्रेसचा अपघात झाला. या अपघाताची कारणं समोर आली आहेत. नेमका कसा अपघात झाला हेही पुढं आलं आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
आज पहाटे झारखंडमध्ये हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसला मोठा अपघात झाला. हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी (क्रमांक - 12810) चक्रधरपूरजवळ रुळावरून घसरली. हा अपघात चक्रधरपूर विभागात राजखरसावन वेस्ट आऊटर आणि बारांबू दरम्यान घडला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत.

नेमका कसा घडला अपघात?
चक्रधरपूरजवळ रुळावर मालगाडीचे काही डबे घसरले होते. त्यानंतर काही वेळाने मुंबई - हावडा मेल धाडधाड् जात होती. ही गाडी चक्रधरपूरनजीक आली तेव्हा मालगाडीचे काही डब्यांचा स्पर्श या एक्स्प्रेसच्या डब्यांना झाला. एक्स्प्रेस एवढ्या गतीनं होती की, त्यातच तिचे 18 डबे रुळावरून घसरले.
घटनास्थळी मदतकार्याला वेग
चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की, रेल्वेची अपघात निवारण ट्रेन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सूचनेवरून मंत्री बन्ना गुप्ता, मंत्री दीपक बिरुआ आणि आमदार दशरथ गगराई घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
झारखंड रेल्वे अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई जाहीर केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्या सहा प्रवाशांनाही भरपाई दिली जाणार आहे.
हे आहे मुख्य कारण
• मालगाडी राजखरसावन आणि पोटोबेडा गावांदरम्यान आधीच रुळावरून घसरली होती.
• मुंबई हावडा एक्स्प्रेस मालगाडीच्या डब्याला धडकली.
• टक्कर झाल्यानंतर पॅसेंजर ट्रेनचे 18 डबे रुळावरून घसरले.
मंत्री बन्ना गुप्ता काय म्हणाले?
#WATCH | Saraikela Kharsawan, Jharkhand: On the train derailment incident, Jharkhand Minister Banna Gupta says, "I express condolences towards the bereaved families on behalf of CM Hemant Soren... CM has said that we will be cooperative with the railways in any kind of assistance… pic.twitter.com/SzANkvAdM1
— ANI (@ANI) July 30, 2024
रेल्वे रुळावरून घसरल्याच्या घटनेवर झारखंडचे मंत्री बन्ना गुप्ता म्हणाले, "मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वतीने मृतांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही रेल्वेला कोणत्याही प्रकारची मदत करू. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची गरज आहे. हा भविष्यासाठी धडा असावा आणि रेल्वेने याचा विचार करायला हवा, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही..."












Click it and Unblock the Notifications