'लॅटरल एंट्री' सारखी षड्यंत्रं कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू ; राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने युपीएससी थेट भरती (Lateral Entry)प्रकरणात यू-टर्न घेतला आहे. मोदी सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) थेट भरतीची जाहिरात रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारच्या यू-टर्नवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जोरदार प्रहार केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेटरल एंट्रीद्वारे थेट भरतीच्या बाबतीत केंद्र सरकारने माघार घेतल्यानंतर टोमणे मारणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "आम्ही संविधान आणि आरक्षण व्यवस्थेचे रक्षण करू. कोणत्याही किंमतीत 'लॅटरल एंट्री'सारखे भाजपचे षड्यंत्र हाणून पाडू. ते पुढे म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो - 50 % आरक्षण मर्यादा तोडून. जाती गणनेच्या आधारावर आम्ही सामाजिक न्याय सुनिश्चित करू. जय हिंद!"
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी लॅटरल एंट्री सिस्टमवर टीका केली आहे. त्यात आरक्षणाची तरतूद नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. सरकारच्या मित्रपक्षांनीही या भरती पद्धतीला विरोध केला. या वादानंतर पंतप्रधान मोदींना हस्तक्षेप करावा लागला.












Click it and Unblock the Notifications