Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाशिवरात्रीला स्नान करणे अमृत स्नान का मानले जात नाही? मग का करतात शाही स्नान जाणून घ्या

Mahakumbh 2025 : प्रयागराजच्या संगमावर सुरू असलेल्या महाकुंभ 2025 मध्ये आतापर्यंत तीन अमृतस्नान झाले आहेत. आता अखेरचे स्थान राहीले आहे ते महाशिवरात्रीच्या दिवशी करता येणार आहे हा अपुर्व योग आहे पण या स्नानाला अमृत स्थान मानले जात नाही.

प्रयागराज संगमावर सुरु असलेल्या महाकुंभात पहिले स्थान मकरसंक्रांत (14 जानेवारी, मंगळवारी), दुसरे स्थान मौनी अमावास्येला (29 जानेवारी, बुधवारी) आणि तिसरा वसंत पंचमी (3 फेब्रुवारी, सोमवार) रोजी झाले होते. या तीन दिवशी भाविकांनी संगमात मोठ्या प्रमाणात स्नान केले.

Mahakumbh 2025

13 जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, मात्र यावेळी केवळ तीन स्नानांनाच अमृतस्नानाचा दर्जा देण्यात आला आहे. माघ पौर्णिमा (24 फेब्रुवारी) आणि महाशिवरात्रीला (26 फेब्रुवारी) स्नानाला अमृत स्नान म्हणून मान्यता नाही. या दिवसांत भाविक संगम स्नान करतील, परंतु ते अमृत स्नान नव्हे तर पवित्र स्नान मानले जाईल.

काय आहेत कारणे

महाशिवरात्री आणि माघ पोर्णिमेला अमृतस्थान मानले जात नाही यामागे धार्मिक कारणे आहेत, ज्यात ग्रहांची विशेष स्थिती आणि शास्त्रीय मान्यता यांचा समावेश आहे. जेव्हा ग्रहांची अनुकूल स्थिती आणि विशेष योग तयार होतात तेव्हाच त्या तिथींना अमृत स्नानाचा दर्जा प्राप्त होतो.

माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला अमृतस्नान का मानले जाणार नाही?

  • महाकुंभातील अमृतस्नानाच्या तारखा ज्योतिषीय गणनेनुसार ठरतात. यासाठी सूर्य मकर राशीत आणि गुरु वृषभ राशीत असणे आवश्यक मानले जाते.
  • मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी ही परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणून त्यांना अमृतस्नानाचा दर्जा मिळाला.
  • माघ पौर्णिमेला (24 फेब्रुवारी) सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, तर गुरू वृषभ राशीत राहील.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी (२६ फेब्रुवारी) सूर्य कुंभ राशीत असेल, त्यामुळे या स्नानांना अमृतस्नानाचा दर्जा मिळणार नाही.

..तरीही स्नानाला या दिवशी असते महत्व

भक्त या दिवसांत संगमात स्नान करून पुण्य लाभ मिळवू शकतात. महाकुंभ 2025 ची सांगता 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या स्नानाने होईल. माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला स्नानाचे महत्त्व माघ पौर्णिमा (24 फेब्रुवारी) आणि महाशिवरात्री (26 फेब्रुवारी) या तिथींना धार्मिक महत्त्व असले तरी अमृत तिथी मानली जाणार नाही. माघ पौर्णिमेला आश्लेषा आणि मघा नक्षत्राचा संयोग सोबत सौभाग्य आणि शोभन योग असेल, ज्यामुळे संगमात स्नान करणाऱ्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते.

महाशिवरात्रीला शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग तयार होतील. या दुर्मिळ योगांमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

महाशिवरात्रीला शाही स्थानाचे महत्व काय?

महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या उपासनेचा विशेष दिवस असून, या दिवशी शाही स्नान केल्याने भक्तांना विशेष पुण्य लाभते, असे मानले जाते. शाही स्नानाला महाकुंभमेळ्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी विविध आखाड्यांचे साधू-संत, विशेषतः नागा साधू, आपल्या शाही ताफ्यांसह पवित्र संगमावर स्नान करतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+