आधार कार्ड हरवले आहे? टेन्शन घेऊ नका; मोबाईलवर फक्त 2 मिनिटांत 'असे' मिळवा तुमचे आधार कार्ड!
Lost Your Aadhaar Card Here is How to Get Your UID Number on Mobile : आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे केवळ ओळखीचे प्रमाणपत्र नसून ती आपली महत्त्वाची गरज बनली आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत १२ अंकी आधार नंबर अनिवार्य आहे. पण जर तुमचे आधार कार्ड हरवले आणि तुम्हाला त्याचा नंबरही माहित नसेल, तर गोंधळून जाण्याचे कारण नाही. UIDAI ने अशा लोकांसाठी अत्यंत सोपी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे.

आधार नंबर विसरलात? असा करा रिकव्हर (ऑनलाईन पद्धत)
जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल, तर तुम्ही घरी बसून आपला आधार नंबर (UID) मिळवू शकता.
- सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होमपेजवरील 'Retrieve Lost or Forgotten EID/UID' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे संपूर्ण नाव आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी भरा. त्यानंतर 'कॅप्चा' कोड टाका.
- 'Send OTP' वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकताच, तुमचा आधार नंबर तुम्हाला SMS द्वारे पाठवला जाईल.
मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे?
अनेकदा जुना मोबाईल नंबर बंद असतो किंवा लिंक नसतो, अशा वेळी तुम्ही खालील दोन मार्ग वापरू शकता.
- हेल्पलाईन नंबर १९४७: तुम्ही UIDAI च्या १९४७ या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकता. तेथे प्रतिनिधीला तुमचे नाव, जन्मतारीख आणि पिन कोड देऊन तुम्ही तुमचा आधार नंबर विचारू शकता.
- आधार केंद्र (ऑफलाईन): जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमचे बायोमेट्रिक्स (ठसे) देऊन ओळख पटवू शकता. केवळ ३० रुपये शुल्क भरून तुम्हाला ई-आधारची प्रिंट मिळेल.
काही महत्त्वाच्या टिप्स
ई-आधारचे महत्त्व: इंटरनेटवरून डाऊनलोड केलेले ई-आधार हे मूळ प्लास्टिक कार्डप्रमाणेच सर्वत्र वैध आहे.
डिजिलॉकर : सुरक्षिततेसाठी आधारची एक प्रत नेहमी डिजिलॉकरमध्ये सेव्ह करून ठेवा.
सुरक्षा: तुमचा आधार नंबर किंवा ओटीपी कधीही अनोळखी व्यक्तीला सांगू नका.












Click it and Unblock the Notifications