मी तोकडे कपडे घालून नाचायला बनलेली नाहीए... 'या' ३० वर्षीय अभिनेत्रीने कुंभमेळ्यात घेतली दीक्षा
प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरु आहे. हा कुंभमेळा रोज वेगवेगळ्या प्रसिद्ध सेलिब्रिटींमुळे चर्चेत येतोय. अनेक महत्त्वाचे व्यक्ती त्रिवेणी संगमात स्नानासाठीही दाखल होताहेत. आता याच कुंभमेळ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ममता कुलकर्णीनंतर आणखी एका मोठ्या अभिनेत्रीने कुंभमेळ्यात दीक्षा घेतली आहे. विशेष म्हणजे वयाच्या फक्त ३० व्या वर्षी व यशाच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीने हा निर्णय घेतला आहे. 'इंदू सरकार' फेम ३० वर्षीय अभिनेत्री इशिका तनेजाने ग्लॅमरविश्वाला अलविदा करत, तिच्या चाहत्यांना धक्का देणारा निर्णय घेतला.

कोण आहे इशिका?
इशिका तनेजाही सध्या फक्त ३० वर्षांची आहे. तिने लंडनमधून शिक्षण घेतले आहे. ती यापूर्वी मिस वर्ल्ड टुरिझमही राहिली आहे. याच इशिका तनेजाने द्वारका-शारदा पीठचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून गुरू दीक्षा घेतली. आयुष्यात काहीतरी कमी आहे, असं वाटत होतं. आयुष्यात सुख व शांती खूप महत्त्वाची आहे, त्याशिवाय आयुष्य सुंदर नाही, असं म्हणत इशिकाने दीक्षा घेण्याचान निर्णय घेतला. याशिवाय मी सनातनी आहे. महाकुंभात दैवी शक्ती आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे मला शंकराचार्यजींकडून गुरु दीक्षा मिळाली आहे. गुरू मिळाल्याने जीवनाला दिशा मिळते, असंही तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
मी नाचण्यासाठी बनले नाही
इशिकाच्या या निर्णयाबाबत तिने एका वृत्तपत्रसाठी मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली, मला गिनीज बुकचा पुरस्कार मिळाला होता. मी मिस वर्ल्ड टुरिझम ही होते. भट्ट साहेबांबरोबर सीरिज केली. टी-सिरीजची अनेक गाणी केली. पण मी योग्य वेळी माघारी परतले. स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला बनलेल्या नाहीत. त्या सनातनच्या सेवेसाठी बनलेल्या आहेत. माझा प्रवास खूप पूर्वीपासून सुरू झाला होता. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा देखील एक भाग राहिले आहे. त्यामुळे मी आता पुन्हा तिकडे परतनार नाही, असं तिने स्पष्ट केलं.
अभिनय नाही तर आता निर्मीती
दीक्षा घेतल्यानंतर आता पुन्हा अभिनयाच्या दुनियेत परतणार नसल्याचं इशिकानं स्पष्ट केलं. ती म्हणाली, "मी पुन्हा कधीच जुन्या लूकमध्ये दिसणार नाही. मला चित्रपट निर्मितीची संधी मिळाली, तर मी ती नक्कीच स्विकारेल. त्यातही सनातनचाच प्रचार करेन, असंही तिने स्पष्ट केलं. भगवे कपडे घालणं ही अभिमानाची बाब आहे, तरुणींनी सुंदर पद्धतीने भगव्या साड्या नेसल्या, तरच सनातन धर्माचा प्रचार होईल, असंही तिनं सांगितलं.












Click it and Unblock the Notifications