पश्चिम बंगाल सरकारचा बलात्काराच्या गुन्ह्यांसाठी नवा कायदा, विधेयकाच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मं
kolkata doctor rape murder case : कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर पश्चिम बंगाल सरकारविरोधात देखील मोठ्या प्रमाणात झाले. आता बंगाल सरकार बंगाल सरकार अशा गुन्ह्यांसाठी नवा कायदा आणत आहे. मंत्रिमंडळाने नवीन विधेयकाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. हे विधेयक 3 सप्टेंबर रोजी विधानसभेत मांडण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्याचे कृषी मंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष विमान बंदोपाध्याय यांना 2 सप्टेंबरपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली जाणार आहे. ते म्हणाले, नवीन विधेयक ३ सप्टेंबरला विधानसभेत मांडले जाईल.
केंद्रावर दबाव आणणार- ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी की, बलात्कारासाठी फाशीची शिक्षा अनिवार्य करण्यासाठी राज्यातील कायद्यात बदल करणार आहोत. ही दुरुस्ती पुढील आठवड्यात विधानसभेत मंजूर केली जाईल. बलात्कारासाठी फाशी ही एकच शिक्षा असावी. ममता बॅनर्जी आपल्या पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. त्या म्हणाला की, बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी तृणमूल काँग्रेस 31 ऑगस्टपासून आंदोलन करणार आहे.

ममता राजभवनाबाहेर आंदोलन करणार
चट्टोपाध्याय म्हणाले की, विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी ते मंजुरीसाठी राजभवनाकडे पाठवले जाईल. राज्यपालांनी हे विधेयक मंजूर करण्यास उशीर केल्यास त्या राजभवनाबाहेर धरणे धरू, असे ममता यांनी दिवसभरात सांगितले होते.
बंगाल जळाले तर... ममतांचा मोदींना इशारा
कोलकाता येथील एका रॅलीदरम्यान ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काही लोकांना हा बांगलादेश वाटतो. मला बांगलादेश आवडते. ते आमच्यासारखे बोलतात आणि आमची संस्कृतीही सारखीच आहे, पण लक्षात ठेवा बांगलादेश हा वेगळा देश आहे आणि भारत वेगळा आहे. भाजपच्या बंगाल बंद दरम्यान निदर्शने आणि जाळपोळ केल्याप्रकरणी ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांच्यावर राज्यात आग लावल्याचा आरोप केला.
कोलकात्याच्या बलात्कार-हत्या प्रकरणात मोदी बाबू आपल्या पक्षाचा वापर करून बंगाल पेटवत आहेत. बंगाल जाळले तर आसाम, ईशान्य, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि दिल्लीही जळतील. आम्ही तुमची खुर्ची पाडू, असा इशाराच ममता यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.












Click it and Unblock the Notifications